कोणत्याही समाजाचा पाया त्याच्या तात्विक अधिष्ठानावर भक्कम झालेला असतो. परंतू पायाच कमकुवत असेल तर समोरची बांधणी भक्कम कशी होणार? वैचारिक अधिष्ठान मजबूत करून आयुष्याची बांधणी करणाऱ्या विचारधारेवर अनेक चित्रपट प्रकाशित झाले आहेत असाच एक नव्याने प्रकाशित झालेला , सामाजिक भान ठेवून प्रेरित करणारा, क्रांतीचे तत्त्वज्ञान सांगणारा समाजाची बांधणी करणारा वास्तवदर्शी चित्रपट म्हणुन (जयंती) चित्रपटाचे महत्व अधोरेखित करता येईल.या चित्रपटातून आजच्या समाजातील असलेल्या प्रत्येक घटकांचा विशेष असा उल्लेख व त्यांच्या समाजात मानला जाणारा विचार यातुन प्रदर्शित करण्यात आला आहे कोणताही महापुरुष एका जातीपुरता मर्यादित नसतो महापुरुषानी सांगितलेला विचार हा निरंतर चालणारा प्रवाह असतो तो कधीच थांबत नाही कोणत्याही महापुरुषाला एकाच जातीच्या बंधनात बांधुन त्यांना व त्यांच्या विचारांना आपण संकुचित ठेवतोय ही जाण आजच्या कट्टरतेकडे झुकलेल्या लोकांना कळत नाही महापुरुष हे सर्वांचेच असतात त्यांनी सांगितलेल्या विचारांपैकी शिक्षण, राजकारण ,अर्थकारण, समाजकारण या सर्वच विषयांचा समावेश प्रत्येकानी आपल्या जिवनात अंगिकारला पाहिजे तेंव्हाच महापुरुषांच्या विचाराचे चिज होईल. नुसते स्मारक बांधून तो विचार रुजवता येणार नाही.त्यांच्या विचारांचे स्मारक आजच्या पिढ्यांनी बांधले पाहिजेत या चित्रपटात असा एक डायलॉग आहे की "स्मारक त्यांचीच बांधावी लागतात ज्यांना लोक विसरतात" ह्या महापुरुषांना कोणीही विसरू शकणार नाही.त्यांच्या विचारांची स्मारके बांधली पाहिजेत. (उदा , शाळा, ग्रंथालय) या चित्रपटातून महापुरुषांचे विचार ,समाजाचं आजचं वास्तव, शिक्षणाचे महत्व , न्यायासाठीचा लढा, संविधानाला अपेक्षित असणारा मार्ग , वर्तमानपत्राची समाजासाठी असलेली महत्वाची भूमिका , हे सुध्दा अधोरेखित करण्यात आलेले आहे. समाजाला जोडुन प्रगती पथावर नेणाऱ्या महापुरुषांच्या विचारांचा प्रसार आणि त्यांच्या कार्याचा उल्लेख या चित्रपटाची , व चित्रपट निर्मात्याची समाजाप्रती असलेली निखळ व निर्मळ भावना यातुन दिसते. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा म्हणून ओळखला जातो बुध्द, सम्राट अशोक, शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर घालणारा महाराष्ट्र अहे. याच भूमीतून या महापुरुषांचे प्रत्येक विचार रुजावेत व त्यांच्या विचारातून प्रत्येकाला न्याय, हक्क, अधिकारमिळाले पाहिजेत व संविधानाला अपेक्षित असणारा समाजाची निर्मिती झाली पाहिजे हे या चित्रपटातून आपणास पाहायला मिळेल..
©निलेश वाघमारे नांदेड
8180869782
No comments:
Post a Comment