कायदेविषयक शिबीर संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 11 November 2021

कायदेविषयक शिबीर संपन्न

किनवट दि.११.: राष्ट्रीय शिक्षण दिना निमित्त तालुका विधी सेवा समिती व अभिवक्ता संघातर्फे आज(दि.११)दुपारी २ वाजता न्यायालयाच्या प्रांगणात कायदे विषयक शिबीर घेण्यात आले.अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी  न्यायाधीश एस.बी.अंभोरे हे होते, तर प्रमुख पाहूणे म्हणून सहाय्यक न्यायाधीश व्ही.जी. परवरे हे होते.

 सूत्रसंचालन ॲड. व्ही. एस. शामीले यांनी केले.यावेळी बोलतांना ज्येष्ठ विधीज्ञ दिलिप काळे यांनी राष्ट्रीय शिक्षण दिनाबद्दल माहिती सांगितली. तर न्यायाधीश श्री. परवरे यांनी कलम २१ ए  बद्द



ल माहिती देत मार्गदर्शन केले . आभार ज्येष्ठ विधीज्ञ किशोर मुनेश्वर यांनी मानले. कार्यक्रमाला ॲड. एस. डी. राठोड , ॲड. काझी , ॲड.गजभारे,ॲड. उदय चव्हाण अभिवक्ता संघाचे सचिव ॲड पंकज गावंडे, ॲड. श्रीकृष्ण राठोड , ॲड टेकसिंघ चव्हाण यांच्यासह न्यालयीन कर्मचारी व पक्षकारांची उपस्थित होती.

No comments:

Post a Comment

Pages