किनवट ,दि.११ : संविधान दिना निमित्त तालुका विधी सेवा समिती व अभिवक्ता संघातर्फे काल(दि.२६)दुपारी २ वाजता न्यायालयाच्या प्रांगणात कायदे विषयक शिबीर घेण्यात आले.अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एस.बी.अंभोरे हे होते, तर प्रमुख पाहूणे म्हणून सहाय्यक न्यायाधीश व्ही.जी. परवरे व अभिवक्ता संघाचे अध्यक्ष एड.अरविंद चव्हाण हे उपस्थित होते.
सूत्रसंचालन ॲड.सर्पे यांनी केले.यावेळी जेष्ठ अभिवक्ता सुभाष ताजने यांनी संविधानाच्या संदर्भाने समयोचित मार्गदर्शन केले. प्रारंभी अभिवक्ता संघाचे सचिव अभिवक्ता पंकज गावंडे यांनी संविधान प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन केले.अभार प्रदर्शन अभिवक्ता श्रीकृष्णा राठोड यांनी केले.कार्यक्रमास वकिल, विधी सेवा समितीचे वरीष्ठ लिपिक एल.वाय.मिसलवार, न्यालयीन कर्मचारी व पक्षकारांची उपस्थित होती.
No comments:
Post a Comment