किनवट ,दि.२७ :
तालुक्यातील लोणी येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती किनवट चे उपसभापती कपिल करेवाड हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता आडे, माजी उपसभापती गजानन पाटील, पंचायत समिती सदस्य निळकंठ कातले, अतुल दर्शनवाड, प्रमोद जाधव, ग्रामविकास अधिकारी लेंडे, गणपत मुंडे, दत्तराम पावडे , उत्तम मेश्राम व मलकु तोडसाम उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थिताच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुष्प पुजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संविधान दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून 'भारतीय संविधान' उद्देशीकेचे वाचन करण्यात आले.
यावेळी गजानन कोल्हे पाटील , अतुल दर्शनवाढ , प्रमोद जाधव , निळकंठ कातले यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश मुनेश्वर या राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी केले, तर आभार विजय पावडे यांनी केले.
कार्यक्रमास झेंडीगुडा शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर महामुने , रमेश तोडसाम , बालाजी तोडसाम , सुनील चव्हाण , अनिल तोडसाम , ज्योती सुरपाम, शंकर सुरपाम, सिताराम मडावी , रमेश तोडसाम , राजू शेडमाके, संदीप किनाके, माणिक शेडमाके, करण पत्रे , दीपक मेश्राम , सुभाष कुरसंगे , रोहित मेश्राम , पंकज मेश्राम , पांडुरंग सुरपाम, भुजंग पेंदोर, गजानन सुरपाम, रोशन मेश्राम, प्रकाश तलांडे , अरविंद कुरसंगे, गणपत नैताम, ईश्वर सुरपाम आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment