खाद्यपदार्थाची गुणवत्ता तपासणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 24 December 2021

खाद्यपदार्थाची गुणवत्ता तपासणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश



  औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्हा पर्यटनाची राजधानी असल्याने येथे येणाऱ्या पर्यंटकांना  स्वच्छ व सुरक्षित अन्न देण्याची जबाबबदारी अन्न औषध प्रशासनाची असल्याने ही जबाबदारी चोखपणे पार पडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात  'ऍडव्हायझरी कमिटी फॉर सेफ फूड अँड हेल्दी डाएट' या विषयाच्या अनुषंगाने पार पडलेल्या  जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. 


            अन्न औषध प्रशासनाने शहरात पुरवठा होणाऱ्या दुधाची शुद्धता तपासणी करावी, अन्न प्रक्रिया व निर्मिती उद्योगात काम करणाऱ्या कामगारांची वैद्यकीय तपासणी करावी, दोन वेळे पेक्षा जास्त वेळा पदार्थ तळण्यासाठी तेल वापरणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी दिले. 

 रस्त्यालगत असलेल्या (फुडस्टॉल) भेळपूरी, पाणीपुरी,वडापाव, कचोरी, दाबेली, पोहे, इडली वडा-सांबर, डोसा, चायनिज तसेच   इतर खाद्यपदार्थाची गुणवत्ता  तपासणी करण्याचे निर्देश ही  श्री.चव्हाण यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Pages