औरंगाबाद : औरंगाबाद शहराची तहान भागविण्यासाठी शासन अनुदानित १६८० कोटी रुपयाच्या नवीन पाणीपुरवठा योजने अंतर्गत हर्सूल भागातील वार्ड क्र.4 पाईपलाईन टाकावी अश्या आशयाचे निवेदन सचिन दाभाडे यांनी कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग यांच्याकडे केली आहे.
हर्सूल भागातील राज नगर ,चेतना नगर ,पोलीस कॉलनी,म्हाडा कॉलनी,रमाई नगर,सईदा कॉलनी, इलियास कॉलनी ,जहांगीर कॉलनी,होनाजी नगर,राजस्थानी कॉलनी कोळीवाड इत्यादी वसाहतीत अद्याप पर्यंत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन केलेली नाही.या भागातील वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे .
खाजगी पाणीपुरवठा करणारे टँकर चालक पिण्याच्या पाण्याची कुठल्याही प्रकारची गुणवत्ता प्रमाणीकरण न करता सर्रास दुर्गंधीयुक्त पुरवठा करत आहेत. हे दूषित पाणी नाईलाजास्तव अव्वाच्यासव्वा दराने नागरिकांना विकत घ्यावे लागत आहे.यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहत आहे.
त्यामुळे या भागात पाण्याची पाईपलाईन टाकून प्रश्न सोडवावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग यांच्याकडे सचिन दाभाडे यांना दिले आहे.
No comments:
Post a Comment