किनवट ( प्रतिनिधी ) :
प्रत्येक पौणिमा ' काव्यपौर्णिमा ' उपक्रमांतर्गत क्रांतिसुर्य प्रतिष्ठान आयोजित कविसंमेलन श्रावस्ती बुध्दविहार आंबेडकर नगर गोकुंदा येथे पार पडले. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी सवित्रीबाई फुले विचार मंचाच्या अध्यक्षा प्राचार्य शुभांगी ठमके ह्या होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आदर्शाची पुजा करण्यात आली. या कवि संमेलनास एकाहुन एक सरस कविता सादर करून कविंनी रसिकांची मने जिंकली.
सुरवातीला प्रा. सुभाष गडलिंग यांनी -
"आंधळ्या परंपरेचे पिक या देशात काढले जात होते
माणसाचे अवमुल्यंन शासन प्रमाण असुन तु विवेकाने पुकारले बंड "
हि विद्रोही रचना सादर केली.
कवयित्री वंदना तामगाडगे यांनी
भीमा तुझ्या शब्दांना हि वैचारिक मंथन घडवुन आणनारी कविता सादर केली.
सांगावाकार महेंद्र नरवाडे यांनी-
"हे शांती दुता तुझ्या ज्ञानाचा
कणातला कण मनातला पुढे रे हाक
चारीत्र्याची खान तु नितीचे भांडार तु "
हि काव्य रचना सादर केली व प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
कवयित्री नंदाताई नगारे यांनी-
"उद्घारक ठरली तु नारी जातीची
माय माऊली सावित्रीमाई फुले अनंत संकटांना तोंड दिले तु ना डगमगले तुझे पाऊल.. "
कवि पाडुंरंग भालेराव यांनी -
दररोज घ्या हो वंदना इथे
या बुध्द विहारी .. हि गेय कविता सादर केली.
कवयित्री सिमा नरवाडे यांनी-
" चल ग सखे थोडस समाधानाने जगुया
विखुरलेल्या या समाजाला डोळसपणे बघुया .."
हि रचना सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
युवाकवी राजेश पाटील यांनी-
" शाळा सुटली पाटी फुटली
घे शिक्षण तु जगभर
लेक तू सावित्रीची शूर "
हि कविता सादर करुन प्रेक्षकांचा उत्साह वाढवला.
या नंतर शिला सेलुकर यांनी-
ये भिमराया तुझ्या पासुनी वेला माझे तरा मानवा घे आमुची वंदना .. हि सुंदर रचना सादर केली.
विश्वास पाटील या नवोदीत कवींनी-
"जागरे पुन्हा भीवा
तु धाव घे पुन्हा भीवा "
हि काव्य रचना सादर केली व प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या .
कवी रुपेश मुनेश्वर यांनी- "झुकला इथेच माथा चरणी तुझ्याच आलो
बुद्घा तुझ्या पायाने जाण्यास मी निघालो "
हि कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कवि अनिल उमरे यांनी-
"निवग क्षणास नेहमी पैशाचे
मुल्य नाही
ओटीत घ्या मनाला हा सुखाचा काळ नाही "
हि जीवनाचा अर्थ सांगणारी कविता सादर केली.
कवयित्री माया सर्पे यांनी शुभेच्छा देतांना वाढदिवसाच्या मन येते गहीवरुन हि छानशी रचना मांडली.
शेवटी कवि समेंलनाच्या अध्यक्षा प्राचार्य शुभांगी ठमके यांनी-
" सुंदर सृष्टी, सुंदर मानव, सुंदर जीवन सारा
सद्धम्माच्या प्रजन्यांने बहरून टाकु सारा "
हि मानवी विचार सांगणारी प्रेरणादायी कविता सादर केली.
या कार्यक्रमात कविंना सावित्रीबाई फुले विचार मंचाच्या अध्यक्षा शुंभागी ठमके यांच्या वाढदिवसा प्रसंगी त्यांच्या हस्ते क्रांतीसुर्य जोतीबा पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
संमेलनाचे उत्कृष्ट असे सुत्रसंचालन कवी रुपेश मुनेश्वर यांनी केले. कार्यक्रमास संजय सेलुकर, रमेश नगारे, शालीनी दिलीप धोंगडे, द मुमेंट स्टुडीओचे अजिंक्य आळणे, ललिता कयापाक, काजल संभाजी भरणे, अर्चना ठमके, माधुरी मुनेश्वर, अनिता बनसोड, किशन कयापाक, आश्वत घुले यांची उपस्थिती लाभली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आंबेडकर नगर येथील श्रावस्ती बुद्ध विहार समितिच्या उपासकांनी अथक परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment