विद्यार्थ्यानां परिक्षा शुल्क भरण्याची ऑनलाईन व्यवस्था करून द्यावी - नसोसवायएफ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 22 December 2021

विद्यार्थ्यानां परिक्षा शुल्क भरण्याची ऑनलाईन व्यवस्था करून द्यावी - नसोसवायएफ

नांदेड दि.२२ | प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेकरीता मागील चार दिवसांपासून सुरू असलेले  विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरुच असल्याने विद्यापीठाचे कामकाज प्रभावीत झाले आहे.

हे आंदोलन शासनानेच विद्यापीठ कर्मचार्‍यांशी भेदभाव करून लादलेले असल्यामुळे सदर आंदोलनाची दखल घेवून शासन अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मागण्या निकाली काढतील, असे वाटत नाही. आज ही राज्यव्यापी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल शासनाने घेतलेली नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांचा शासनाप्रती रोष व्यक्त केला जात आहे. सदर आंदोलनामुळे विद्यार्थी वर्ग भरडल्या जात असून विद्यार्थ्यांचे कोणतेही कामकाज होत नसल्यामुळे अडचणीत सापडले आहेत, असे प्रा. सतीश वागरे यांनी  कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

   विद्यापीठाचे सर्व अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी असल्यामुळे सर्वच कार्यालयांमध्ये  कामकाजआज बंद आहे.  कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय कामकाज विद्यापीठात होवू शकले नाही. सदर आंदोलन यापुढे असेच सुरू राहिल्यास विद्यापीठाच्या परिक्षांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होवू शकते. त्यामुळे  विद्यापीठ प्रशासनाने   सदर आंदोलनाचे गांभिर्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क भरण्याचा ऑनलाइन मार्ग सुरळीत करावा.

असे एका निवेदनाद्वारे प्रा.सतिश वागरे (राज्य प्रवक्ता,नसोसवायएफ) संदीप जोंधळे (जिल्हा प्रभारी,नसोसवायएफ) यांनी कुलगुरूंना दिले आहे.No comments:

Post a Comment

Pages