दलित पँथर च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आम्ही पँथर या गीताचे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते लोकार्पण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 30 December 2021

दलित पँथर च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आम्ही पँथर या गीताचे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई दि 30 - दलित पँथर च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमीत्त दलित पँथर च्या चळवळीवर आधारित आम्ही पँथर या गीताचे  लोकार्पण  आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या हस्ते बांद्रा येथे झाले. यावेळी  आम्ही पँथर या गीताचे गीतकार निर्माते गायक संघरत्न राजेंद्र झेंडे  ; त्यांचे वडील राजेंद्र झेंडे; साप्ताहिक राष्ट्रभक्ती चे संपादक विलास जाधव; त्रिभुवन गुरुजी; चित्रपट निर्माते दिग्दर्शक अनिल शिंपी ; शिवाजी मोकळ आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.  


आम्ही पँथर या गीताचे गीतकार संघरत्न झेंडे आणि ऋषिकेश कदम हे असून संगीत संयोजक जयेंद्र भांडे असून या गीताचे निर्माते  अश्वघोष थिएटर चे राजेंद्र झेंडे आहेत.दलित पँथर चळवळीवर आम्ही पँथर या  गीताची  निर्मिती केल्या बद्दल ना.रामदास आठवले यांनी संघरत्न झेंडे आणि राजेंद्र झेंडे या पितापुत्राचे कौतुक केले.  

आम्ही पँथर हे गीत 1 जानेवारी 2022 रोजी युट्युब वर सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे अशी माहिती संघरत्न झेंडे यांनी दिली. 


                

No comments:

Post a Comment

Pages