डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्ज स्विकारण्याची तारीख वाढवून देण्यात यावी - राहुल मकासरे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 29 December 2021

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्ज स्विकारण्याची तारीख वाढवून देण्यात यावी - राहुल मकासरे



औरंगाबाद :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शैक्षणिक वर्ष 2020-21 व 2021-22 चे अर्ज सादर करण्यासाठी अंतिम दि. 31 डिसेंबर 2021 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.

दि. 27 डिसेंबर 2021 रोजी रात्री उशिरा पत्रक टाकल्यामुळे विद्यार्थी हे अडचणीत सापडले आहेत.कारण तीन दिवसामध्ये कागदपत्रे कसे जमा करायचे? हा सर्वात मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडलेला आहे. विद्यार्थ्याला किंवा त्याच्या पालकांना तहसिल कार्यालयाचे उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी किमान 4-5 दिवसाचा कालावधी लागतो, तर मग विद्यार्थ्यांनी 3 दिवसा मध्ये कागदपत्रे तयार करून अर्ज कसा द्यायचा? अगोदरच कोरोना महामारीमुळे विद्यार्थी व पालक यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.  या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेपासून वंचित राहतील यात तिळमात्र शंका नाही.

◆सामाजिक न्याय मंत्री धंनजय मुंढे यांनी घेतलेल्या नवीन निर्णया नुसार, म.न.पा. हद्दीच्या १० कि.मी. हद्दीतील महाविद्यालयांचे प्रवेश करून घ्यावा.

 ◆ सर्व पात्र महाविद्यालयात  योजनेचा प्रसार व प्रचार आणि योजना चांगल्या प्रकारे राबवण्यासाठी सुचाना पत्रक प्रसिद्धी करण्यात यावे.

विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी तीन आठवडे म्हणजेच 21 जानेवारी 2022 पर्यंत मुदतवाढ द्यावी. अश्या मागणीचे निवेदन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना दिले आहे .

 अन्यथा आजाद समाज पार्टी तर्फे तीव्र आंदोलन छेडन्यात येईल असा इशारा आझाद समाज पार्टी शहर जिल्हा अध्यक्ष राहुल मकासरे यांनी दिला.

No comments:

Post a Comment

Pages