औरंगाबाद : मागासवर्गीयांच्या अनेक योजना निधी अभावी डावलण्यात येत आहे.समाजकल्याणचा निधी जाणीवपूर्वक आखर्चित ठेऊनमागासवर्गीय समाजाला योजनांपासून वंचीत ठेवण्याच काम मुंडे करीत आहेत.हा सर्व प्रकार जातीय द्वेषातुन होतो की काय ? असा प्रश पडला आहे.
गेल्या पाच दिवसांपासून मागासवर्गीय संशोधक विद्यार्थी हे परळी येथील उपविभागीय कार्यालयासमोर येथे एम.फील.ते पी. एच.डी. दिली जावी या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत.पण मुंडेंनी याठिकाणी तीस सेकंदाची भेट दिली पण त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत.
जर समाजकल्याण खात्याचा निधी योग्य ठिकाणी खर्च होत नसेल तर ते खात बंद करून मुंडेंची हकालपट्टी करावी अशी मागणी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे अतुल कांबळे , पँथर्स रिपब्लिकन पार्टी चे गुणरत्न सोनवणे यांनी मुख्यमंत्री कक्ष औरंगाबाद विभागाकडे केली आहे.
No comments:
Post a Comment