किनवट आगारातील एस. टी. कर्मचाऱ्याची आत्महत्या - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 26 December 2021

किनवट आगारातील एस. टी. कर्मचाऱ्याची आत्महत्या

नांदेड दि 26 (प्रतिनिधी) : एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरूच असून संपा दरम्यान नांदेड मध्ये आणखी एका एसटी वाहकाची गळफास घेऊन आत्महत्या

 केल्याची घटना रविवार दि 26 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे़ या घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या संतापात भर पडली आहे़.


  राज्य शासनाकडे विलीनीकरण करून घ्यावे,शासकीय कर्मचाऱ्यांसारखी वेतनवाढ द्यावी यासह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद करून संप सुरू केला आहे़. नांदेड जिल्ह्यासह राजयभरात हा संप अजूनही सुरुच आहे. काही दिवसापुर्वी शासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसह काही मागण्या मंजूर करुन कर्मचाऱ्यांना कामावर परत रुजू होण्याचे आवाहन केले होते. मात्र कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. संपा दरम्यान दि. ३ डिसेंबर रोजी नांदेड आगारातील एसटी कर्मचारी असलेले दिलीप वीर यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. तेव्हापासून नांदेडच्या कर्मचाऱ्यांनी संपादरम्यान दुखवटा आंदोलन सुरुच ठेवले आहे. कर्मचाऱ्यांचा संप मिटेल असे वाटत असतांनाच नांदेडात आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा बळी गेला आहे. एसटी महामंडळाच्या किनवट आगारात जेष्ठ वाहक म्हणून भिमराव एन. सदावर्ते हे कार्यरत होते. तर सिडको भागात ते राहत होते. या राहत्या घरातच भीमराव सदावर्ते वय ५७ वर्षे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस येताच अनेकांना धक्का बसला. ही बातमी एसटी कर्मचाऱ्यांना समजताच त्यांच्या संतापात भर पडली आहे. राज्य  शासनाने कर्मचाऱ्यांचा आणखी अंत न पाहता एसटीचे विलीनीकरण करुन घ्यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.


No comments:

Post a Comment

Pages