दिव्यांगजनांचा नोकरीतील अनुशेष भरून काढण्याकडे राज्यसरकार ने लक्ष द्यावे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 26 December 2021

दिव्यांगजनांचा नोकरीतील अनुशेष भरून काढण्याकडे राज्यसरकार ने लक्ष द्यावे

मुंबई दि.26 -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र  सरकार दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी झटत आहे. दिव्यांगजनांना नोकरी मध्ये 4 टक्के आणि शिक्षणा मध्ये 5 टक्के आरक्षण मोदी सरकार ने दिले आहे..

मी प्रत्येक राज्यात जातो तेंव्हा तिथे दिव्यांगजनांना नोकरी मधील 4 टक्के जागा भरल्यात का याची माहिती घेतो.तेंव्हा  असे आढळते की दिव्यांगजनांच्या जागा पूर्ण भरलेल्या नसतात. महाराष्ट्र राज्य सरकार ने ही दिव्यांगजनांचा नोकरीतील अनुशेष भरून काढावा अशी सूचना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.


नवी मुंबई खारघर येथे राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग संस्थेच्या  प्रादेशिक केंद्राच्या  नवीन सुसज्ज इमारतीचे उदघाटन ना.रामदास आठवले यांच्या हस्ते  झाले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिमा भौमिक या कोलकत्त्यातून आभासी माध्यमातून उपस्थित होत्या.तसेच  खासदार श्रीरंग बारणे; प्रो.सौगत रॉय; डॉ प्रबोध सेठ;संचालक मेजर राम कुमार; पनवेल चे उपमहापौर जगदीश गायकवाड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.


लहान मुलांमधील दिव्यांगता लवकर ओळखली तर त्यावर लवकर  उपाय करता येतात.आता फिजियो थेरपी स्पीच थेरपी आदी अनेक आधुनिक उपचारपद्धतीने दिव्यांग मुलांना नवजीवन मिळत आहे.दिव्यांगांना आपुलकीने वागविले पाहिजे.त्यांच्यातील कौशल्य विकसित केले पाहिजे.आता दिव्यांग खेळाडू चांगली कर्तबगारी करीत असून सामाजिक न्याय मंत्रालया तर्फे दिव्यांग खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडाकेंद्र उभारणार आहोत अशी माहिती ना रामदास आठवले यांनी दिली. यावेळी दिव्यगांना उपयोगी वस्तूंचे वाटप ना रामदास आठवले यांच्या हस्ते झाले.


                

No comments:

Post a Comment

Pages