डॉ.बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शहीद स्मारकाचे कुलगुरू यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 14 January 2022

डॉ.बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शहीद स्मारकाचे कुलगुरू यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न

 


औरंगाबाद, दि.१४ : विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव तत्कालीन मराठवाडा विद्यापीठास देण्यात यावे ह्यासाठी १७ वर्ष संघर्ष करून अस्मितेच्या स्वाभीमानाच्या लढ्यात शहिद झालेल्या नामांतर शहीदांचे भव्य स्मारक करण्यात यावे,अशी मागील अनेक वर्षांपासून नामांतरवादी नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. 

  ह्या मागणीनुसार आज(दि.१४) सकाळी सात वाजता बहुप्रतिक्षित नामांतर शहीद स्मारकाचे विद्यापीठ गेट शेजारी कुलगुरू प्रमोद येवले यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. शहीद झालेल्या सर्व भीम सैनिकांना अभिवादन करून यावेळी बोलताना त्यांनी ग्वाही दिली की,  पुढील १४ जानेवारीपर्यंत स्मारकाचे काम पूर्ण होईल.

No comments:

Post a Comment

Pages