किनवट ,दि.५ : प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज(दि.५)सकाळी ११ वाजता सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच.पुजार व तहसीलदार डॉ. म्रणाल जाधव यांच्या हस्ते कनकवाडी व वझरा (बु.ता.किनवट) येथील जिल्हा परिषद शाळेला महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले.प्रास्ताविक अभियानाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी समन्वय श्रीकांत राठोड यांनी केले.सूत्रसंचालन विनायक मुंडे यांनी केले,अभार प्रदर्शन अभियानाचे तालुका समन्वयक जयपाल कांबळे यांनी केले.यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार 'ग्रामगिता',हा ग्रंथ देऊन करण्यात आला. कार्यक्रमास पंचायत समितीचे उपसभापती कपिल करेवाड,गटविकास अधिकारी सुभाष धनवे,दत्ता आडे, नायब तहसीलदार एन.ए.शेख,शिक्षण विस्तार अधिकारी एस.व्ही.मेश्राम, कनकवाडीच्या शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष पंडित व्यवहारे,मुख्याध्यापक डी.बी.राणे, वझ-याच्या शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्रीनिवास येलवाड,मुख्याध्यापक जी.डी.मेश्राम, एड.एम.यु.सरपे,आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment