महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर करून केले नववर्षाचे स्वागत ; हिमालया अकॅडमीच्या गिर्यारोहकांनी सर केले महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 5 January 2022

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर करून केले नववर्षाचे स्वागत ; हिमालया अकॅडमीच्या गिर्यारोहकांनी सर केले महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर

नांदेड- येथील हिमालया अकॅडमी ऑफ स्पोर्ट्स अॅडवेंचर द्वारा  नवीन वर्षानिमित्त आयोजित कळसुबाई शिखर आरोहण मोहिमेत नांदेडमधील 20 गिर्यारोहकांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकावून नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. हिमालया अकॅडमीचे संचालक ओमेश पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोहिमेमध्ये नांदेड मधील डॉक्टर्स,  खाजगी कंपनी बजाज फायनान्स कंपनीतील कर्मचारी, शिक्षक, व्यावसायिक, विद्यार्थी सहभागी झाले होते.या मोहिमेसाठी नांदेडहून निघतानाच माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे,डॉ.उमेश भालेराव,सौ.कविता जोशी शिरपुरकर,लक्ष्मण मदने या पर्यावरण प्रेमींचे हस्ते या ट्रेकला शुभेच्छा देण्यात आल्या व बारी गावाच्या दिशेने टीम रवाना झाली.

कळसुबाई हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील सर्वोच्च शिखर असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून 1646 मीटर इतकी आहे.या ट्रेकला जाणाऱ्या गिर्यारोहकांची चालण्याची क्षमता चांगली असावी लागते तरच ते शेवटपर्यंत टिकू शकतात.सकाळी 9 वा. हिमालया टीमच्या सदस्यांनी शिखर चढायला सुरुवात केली. चढाईचा शेवटचा टप्पा शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा आहे.हे सर्व टप्पे पार करून सर्व च्या सर्व टीम शिखराच्या माथ्यावर असलेल्या आई कळसुबाई देवीच्या मंदिरा पर्यंत पोहोचली व तिरंगा ध्वज फडकवून आनंद साजरा केला.

शिखराच्या माथ्यावरुन सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगर रांगा, भंडारदरा धरण,रतनगड, कात्राबाईचे जंगल व इतर दूरवरचे डोंगर परिसर,गावे पाहायला मिळतात. हे विहंगम दृश्य डोळ्यात साठवून सर्व टीमने खाली उतरण्यास सुरुवात केलीच होती की पावसाला सुरुवात झाली. आणि पावसात शिखरावरून खाली येणे खूप धोकादायक तसेच पाय घसरून पडण्याचे धोका पत्करून

 हिवाळ्यात पावसाळ्याचा आनंद घेत भिजत भिजत सर्व टीम सायंकाळी साडेपाच वाजता पायथ्याशी असलेल्या बारी गावात पोहोचली व अशाप्रकारे टीम मधील सर्व सदस्यांनी नववर्ष स्वागताचा जल्लोष आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करून येणारे वर्ष असेच जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात घालवण्याचा संकल्प केला.या शिखर मोहिमेत 

कपिल टाक, साईनाथ माळवतकर, निलेश जामकर, डॉ.अनिल देवसरकर,डॉ. रामचंद्र हेंडगे, डॉ.गजानन पवार,डॉ.गजानन कर्हाळे,डॉ.सतिश गायकवाड,डॉ.सम्राज्ञी पाध्ये,प्रल्हाद इंगोले,अनुराधा इंगोले,संतोष दंडे, आदित्य माने,पुष्कर फलटणकर,प्रतिक्षा इंगोले,अश्विनी पांचाळ,बेबी नातेवार,अजित देशमुख,प्रशांत कदम,प्रविण कदम हे गिर्यारोहक सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

Pages