नांदेड दि. 28 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने पक्के अनुज्ञप्ती चाचणी संबंधी शिबिराचे आयोजन हिमायतनगर येथे 17 फेबुवारी तर माहूर येथे 21 फेबुवारी रोजी करण्यात येणार आहे. या शिबिराच्या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर झाल्यास अथवा आपत्कालीन परस्थिती निर्माण झाल्यास शिबिराच्या तारखेत बदल होवू शकतो. या शिबिराकरिता 1 फेबुवारी 2022 रोजी कार्यालयीन वेळेत अपॉईंटमेंट खुल्या होतील. सर्व अर्जदारांनी उपलब्ध अपॉईंटमेंट घेऊन कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्रासह या शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment