सेट परीक्षेत जयपाल कांबळे चे यश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 28 January 2022

सेट परीक्षेत जयपाल कांबळे चे यश

  नांदेड:    सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत(सेट) टेंभुर्णी येथील जयपाल व्यंकटी कांबळे या विद्यार्थ्याने यश संपादन केले आहे.

         पुणे विद्यापीठामार्फत विविध विषयासाठी प्राध्यापक होण्यासाठी पात्रता परीक्षा घेण्यात येते. या पात्रता परीक्षेत राज्यभरातून विविध विषयासाठी लाखो फॉर्म येत असतात. राज्यशास्त्र या विषयात टेंभुर्णी(ता.नायगाव) येथील सुपुत्र जयपाल व्यंकटी कांबळे यांनी यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य, मामा आणि मित्र परिवार या सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांना सदिच्छा व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

2 comments:

Pages