रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या मागणीस यश परीक्षेच्या आवेदनपत्रास लावलेले विलंब शुल्क माफ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 27 January 2022

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या मागणीस यश परीक्षेच्या आवेदनपत्रास लावलेले विलंब शुल्क माफ

 

औरंगाबाद :

 रिपब्लिकन सेनेच्या वतीने परीक्षेच्या आवेदन पत्रास विलंब शुल्क न लावता आवेदनपत्र भरण्याची मुदत वाढ करण्याची मागणी  दि.20 जानेवारी रोजी मा.कुलगुरू डॉ.येवले ह्यांना निवेदन देऊन करण्यात आली होती 

 त्यानुसार दि . २४/०२/२०२२ रोजीच्या पत्रानुसार पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे आवेदन पत्र भरण्याची मुदत वाढ करण्यात आली आहे परंतु विलंब शुल्क तसेच ठेवल्याने विद्यार्थी हवालदिल झाले होते परंतु अतिविलंब शुल्क लावल्याने प्रति विद्यार्थी 1600 रु विलंब शुल्क व नियमित शुल्क असे एकूण 2100 ते 2300 रु चा भुर्दंड विद्यार्थ्यांना बसणार असल्याने

दि.25 रोजी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम,ऍड.अतुल कांबळे, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीचे गुणरत्न सोनवणे,ऍड.बुद्धपाल,विकास रोडे ह्यांनी कुलगुरूंची भेट घेऊन विद्यार्थी हिताचा विचार करून विलंब शुल्क तात्काळ मागे घ्यावे ह्यासाठी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.


 सोबतच राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झल्याने ओला दुष्काळ असल्याची स्थिती निर्माण झाली आहे . शिवाय ओमायक्रॉनाचा प्रादूर्भाव असल्याने विविध वस्तीगृह देखील खाली करण्यात आले आहे . नैसर्गिक आपत्तीमुळे , कोविडमुळे नागरीक हवालदिल झालेले असतांना विद्यापीठाने लागू केलेले विलंब शुल्क भरणे विद्यार्थ्यांना शक्य नसल्याकडे कुलगुरूंचे लक्ष वेधण्यात आले.

 

 मागील २ वर्षापासून अनेकांचे रोजगार बुडाले आहेत,अनेक कुटूंबावर कुटूंबातील सदस्य दगावल्यापे दुःखाचा डोगंर कोसळलेला आहे, त्यामुळे लागू केलेले विलंब शूल्क अन्यायकारक असल्याची जाणीव करून देण्यात आली.


तसेच विद्यापीठ प्रशासन सर्वच परीक्षा ऑनलाईन घेत असल्याने अशा प्रकारची शुल्क वसुली करणे हे अवाजवी असल्याचे  करण्यात आला . 


मागील २ वर्षापासून पेपर सेटींग करणाऱ्या प्राध्यापकांचे मानधन विद्यापीठाने अदा केले नाही, असे असतांना कुठल्याही पेपर सेटरचे मानधन अदा न करता , परीक्षेच्या कामासाठी येणारा कुठलाही खर्च न करता ( प्रश्नपत्रिका , उत्तपत्रिका छापनी , उत्तपत्रिका वाहतूकीसाठी लागणारा खर्च , पर्यवेक्षकांना मानधन अदा न करता , व इतर सर्व प्रकारचा खर्च ) अशा प्रकारे विलंब शुल्क लावून केवळ परीक्षेतून पैसा उभा करणे जर विद्यापीठाचा हेतू असेल तर हा प्रकार धक्कादायक आहे ह्यावर संघटनेने आक्षेप घेतला


मागील परीक्षा विभागाचे संचालक श्री . पाटील यांनी तत्कालीन परीस्थितीनुसार विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचा वाढीव भुर्दंड बसू नये याची काळजी घेतली होती . परंतु विद्यार्थी व विद्यार्थी संघटनेने मागणी करून देखील विद्यापीठ प्रशासन विलंब शुल्क घेण्यावर ठाम असेल तर या विरोधात लोकशाही मार्गाचा अवलंब करण्याचा इशारा देण्यात आला. 

 

त्यानुसार विद्यापीठाने आज परिपत्रक कडून अति विलंब शुल्क रद्द करून प्रतिदिन 10 रु विलंब शुल्क आकारून दि 31 जानेवारी पर्यंत आवेदन पत्र सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Pages