राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने “लोकशाहीची भिंत” भिंतीवरील चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 21 January 2022

राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने “लोकशाहीची भिंत” भिंतीवरील चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद


नांदेड  दि. 21 :- बारावा राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2022 रोजी नांदेड जिल्ह्यात साजरा करण्यात येणार आहे. निवडणूक विषयक प्रक्रिया व मतदार जनजागृती करण्यासंदर्भाने विविध उपक्रम नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या संकल्पनेतून नांदेड शहरातील विद्यार्थी, चित्रकला शिक्षक व इतर नागरीकांसाठी “लोकशाहीची भिंत” या खुल्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन आज कृषी तंत्र विद्यालय काबरानगर रोड नांदेड येथे करण्यात आले होते. “लोकशाहीची भिंत” या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य पवन ढोके यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्था्नी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती दीपाली मोतीयेळे या होत्या.  


नांदेड शहरात “लोकशाहीची भिंत” ही स्पर्धा मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण करेल. आठरा वर्ष पूर्ण झालेले मतदार निश्चितच प्रेरणा घेऊन मतदार यादीत आपले नाव नोंदवतील. सर्व सुजाण नागरिक मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावतील, असे प्रतिपादन उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती दिपाली मोतीयेळे यांनी केले. यावेळी सर्व स्पर्धक व चित्रकला शिक्षकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.  


नांदेड कृषी तंत्र विद्यालय येथील संरक्षण भिंतीवरील दर्शनी भागावर निवडणूक विषयक प्रक्रिया व मतदार जनजागृती विषयक चित्रे काढण्यात आली. या स्पर्धेसाठी चित्रकला शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थीनी, इतर स्पार्धकांचा उत्फूर्त  प्रतिसाद  मिळाला. या स्प्र्धेत शहरातील 11 चित्रकला शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थीनी असे जवळपास चाळीसच्यावर स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. 


यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसिलदार किरण आंबेकर, नायब तहसिलदार डी. एन. पोटे,  नायब तहसिलदार श्रीमती स्नेअहलता स्वाामी, नायब तहसिलदार श्रीमती उर्मिला कुलकर्णी, उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय मठपती, विस्तार अधिकारी राजेंद्र शेटे, जिल्हाधिकारी कार्यालयातील फैय्याज खान, शरद बोरामने, विनोद मनवर यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले तर आभार राजेश कुलकर्णी यांनी मानले. परिक्षक म्हणून श्रीमती कविता जोशी, सुरेश कुऱ्हाडे, विजय सावंत, विलास झोळगे, शैलजा बुरसे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तलाठी नारायण गाढे, माणिक भेासले, संजय भालके, के. डी. जोशी, आर. जी. कुलकर्णी, पी. एम. कुलकर्णी, सय्यद, बडुरे, विनोद जोंधळे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages