नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोणा रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात घेता रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याचे अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने भक्ती लॉन्स येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे .महापौर सौ. जयश्री निलेश पावडे यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
नांदेड शहर आणि जिल्हाभरात गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्य रुग्ण संख्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातल्या त्यात महानगरपालिकेच्या परिक्षेत्रात रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्यसेवेच्या कोणत्याही समस्या निर्माण होऊ नये यासाठी महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी मंत्री डी पी सावंत, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे . या कोविड केअर सेंटर मध्ये कोरोणा रूग्णांसाठी अत्यावश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत . त्यामुळे नांदेड शहरातील नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही मात्र प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. घराबाहेर अत्यावश्यक कामासाठी पडणे आवश्यक असून नाकातोंडावर मुखपट्टी बांधावी, हात आणि तोंड वेळोवेळी स्वच्छ ठेवावे आणि सॅनिटायझरचा योग्य वेळी वापर करावा. इतरांशी संवाद साधत असताना सुरक्षित अंतर बाळगावे आणि कोरोना लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन महापौर सौ. जयश्री निलेश पावडे यांनी केले .नांदेड शहरात रुग्ण संख्या वाढत असली तरी आरोग्य सेवा सज्ज आहे अशी माहितीही या वेळी महापौर सौ जयश्री पावडे यांनी दिली दिली.
सदर कार्यक्रमास आयुक्त सुनिल लहाने, उपमहापौर अ.गफार अ. सत्तार, स्थाई सभापती किशोर स्वामी, सभागृह नेता महेश कनकदंडे, महिला बालकल्याण सभापती संगिता डक , अभियंता. गिरीष कदम, अतिरीक्त आयुक्त अजितपालसिंघ संधु, उपआयुक्त संजय जाधव, सहाय्यक आयुक्त डॉ. सुरेशसिंग बिसेन , वैद्रकीय आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम भुरके, डॉ. देवानंद देवसरकर, डॉ. हनुमंत रिठ्ठे व आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
दिनांक १९ जानेवारी २०२२ पासुन सदर कोविड केअर सेंटर मध्ये कोविड बाधित रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले. तरी जनतेनी याचा लाभ घ्यावा. असे अवाहन मनपा प्रशासना तर्फे करण्यात येते..
No comments:
Post a Comment