मिलिंद प्राथमिक आणि मिलिंद विद्यालयात कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन क्लास सुरू - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 21 January 2022

मिलिंद प्राथमिक आणि मिलिंद विद्यालयात कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन क्लास सुरू

 


कुंडलवाडी(जय भोसीकर)-

येथील सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मिलिंद प्राथमिक आणि मिलिंद  विद्यालयात कोरोना काळात सध्या इयत्ता पहिली ते दहावी पयॅतच्या सर्व शाळा बंद आहेत.या काळात  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष कुणाल एस.  लोहगावकर यांच्या आदेशानुसार व  माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक यु.एस .राठोड आणि प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक डी.एस.पांचाळ  यांच्या मार्गदर्शनाखाली  शाळेतील सर्व विषयाचे शिक्षक इयत्ता सहावी  ते दहावी पयॅतच्या सर्व  विद्यार्थ्यांना ऑनलाइन /वरच्युअल क्लास वरून अध्यापन देण्याचे काम सुरू केले आहे. याबाबत या शाळेतील पालक व विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष,मुख्याध्यापक व सर्व शिक्षकाबदल  समाधान व्यक्त करीत आहेत .याबाबत सविस्तर माहिती अशी की,  संस्थेचे अध्यक्ष कुणाल एस. लोहगावकर यांनी शाळेला सुनियोजित  भेट देऊन शाळेतील शैक्षणिक बाबींचा आढावा बैठक घेतली.या 

 आयोजित केलेल्या शैक्षणिक बैठकीत त्यांनी शिक्षकांना सुचित  केले की, सध्या कोरोना मुळे शाळा बंद आहेत. कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आपण सर्व शिक्षकांनी त्वरित लवकरात लवकर ऑनलाइन/वर्च्युअल क्लास सुरू करावे असे आदेश दिले.या आदेशाचे पालन करत या शाळेतील सर्व शिक्षकांनी लगेच आपआपल्या वगाॅतील इयत्ता सहावी  ते दहावी पयॅतच्या सर्व   मुलांना  लॅपटॉप, मोबाईल व संगणकावर विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे ऑनलाइन क्लास /व्हर्च्युअल क्लास सुरू केलेले आहेत.संस्थाचालक ,मुख्याध्यापक व शिक्षकांच्या या निर्णयामुळे या शाळेतील सर्व विद्यार्थी व पालक समाधान व्यक्त करीत असून शाळेचे संस्थाचालक , शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांचे   विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन व कौतुक करित आहेत.

No comments:

Post a Comment

Pages