किराणा दुकान आणि सुपर मार्केट मध्ये मद्यविक्रीचा निर्णय निषेधार्ह - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 29 January 2022

किराणा दुकान आणि सुपर मार्केट मध्ये मद्यविक्रीचा निर्णय निषेधार्ह - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले



मुंबई  दि  29 - किराणा दुकान आणि सुपर मार्केट मध्ये दारूची मद्यविक्री करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय अत्यंत निषेधार्ह आहे. समाज विघातक निर्णय आहे .खोडसाळ निर्णय आहे. या निर्णयाचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत आहोत  असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.

 किराणा मालाचे दुकान आणि सुपर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गृहिणी महिला विद्यार्थी लहान मुले जात असतात. गृहपयोगी वस्तू घेत असतात. अशा दुकानांमध्ये जर मद्य विक्री सुरू झाली तर  तो राज्य सरकार चा निर्णय समाजासाठी घातक निर्णय ठरेल . त्यामुळे व्यापारी वर्गाने त्यांच्या किराणा  दुकानात मद्य विक्री करू नये  असे आवाहन रिपब्लिकन पक्षातर्फे करीत आहोत.तसेच ज्या किराणामाल आणि सुपर मार्केटमध्ये मद्यविक्री होत असेल अशा दुकानातून जनतेने कोणत्याही वस्तू  खरेदी करू नये. मध्य विक्री करणाऱ्या किराणामाल दुकान आणि सुपर मार्केटवर जनतेने बहिष्कार टाकावा असे आवाहन आज  नामदार रामदास आठवले यांनी केले.
 किराणामाल आणि सुपर मार्केट दुकानात मध्य विक्री करण्याचा राज्य शासनाचा निर्णय अत्यंत खोडसाळ आहे हा निर्णय त्वरित रद्द करावा अन्यथा रिपब्लिकन पक्ष महाविकास आघाडी सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडेल  असा इशारा ना. रामदास आठवले यांनी दिला आहे.

         

No comments:

Post a Comment

Pages