हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेला २८ फेब्रुवारीपासून नांदेड येथे प्रारंभ; एकूण १५ नाट्य प्रयोगाचे होणार सादरीकरण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 23 February 2022

हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेला २८ फेब्रुवारीपासून नांदेड येथे प्रारंभ; एकूण १५ नाट्य प्रयोगाचे होणार सादरीकरण

नांदेड,  दि. 23 :-  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ६० वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा नांदेड येथे येत्या 28 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे.  महाराष्ट्रात ही स्पर्धा  विविध १९ केंद्रांवर २१ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव  देशमुख यांच्या पुढाकाराने कोविड नंतर सुरु होणाऱ्या या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

दुसऱ्या टप्प्यात नांदेड येथे २८ फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या स्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकांची नावे व तारखा पुढीलप्रमाणे आहेत.  नांदेड शहरातील कुसुम सभागृहात रोज सायंकाळी ७ वाजता हे सादरीकरण होईल. येथील केंद्रावर नांदेड, परभणी आणि बीड जिल्ह्यातील  एकूण १५ नाट्य प्रयोगांचे सादरीकरण होणार आहे. 


यात २८ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा नांदेडच्यावतीने गोविंद जोशी लिखित, दिग्दर्शित “स्पेस”, १ मार्च रोजी बालगंधर्व सांस्कृतिक कला, क्रीडा व युवक मंडळ परभणीच्या वतीने रविशंकर झिंगरे लिखित, मधुकर उमरीकर दिग्दर्शित “उद्रेक”,२ मार्च रोजी छत्रपती सेवाभावी संस्था,उखळी,जी.परभणीच्यावतीने अभिजित वाईकर लिखित, सोनाली डोंगरे दिग्दर्शित “कधी उलट कधी सुलट”, 3 मार्च रोजी स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेडच्या वतीने सुदाम केंद्रे लिखित, श्याम डुकरे दिग्दर्शित ”टकले रे टकले” ४ मार्च रोजी क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्ट परभणीच्या वतीने रविशंकर झिंगरे लिखित,सौ. सुनिता करभाजन दिग्दर्शित “भयरात्र”, ५ मार्च रोजी नटराज कला विकास मंडळ जिंतूर, जी. परभणीच्या वतीने अतुल साळवे लिखित, दिग्दर्शित “धर्मदंड”, ६ मार्च रोजी राजीव गांधी युवा फोरम, परभणीच्यावतीने रविशंकर झिंगरे लिखित, विजय करभाजन दिग्दर्शित “ड्रीम्स रिले”, ७ मार्च रोजी संत सर्वज्ञ दासो दिगंबर सेवाभावी प्रतिष्ठान बीड, नांदेड शाखेच्या वतीने डॉ. हेमंत कुलकर्णी लिखित, राजीव किवळेकर दिग्दर्शित “दास्ताँ”, ८ मार्च रोजी सरस्वती प्रतिष्ठान नांदेडच्यावतीने किरण पोत्रेकर लिखित, सौ. स्वाती देशपांडे दिग्दर्शित “कळा या लागल्या जीवा”,९ मार्च रोजी शक्ती बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान, नांदेडच्यावतीने गिरीश जोशी लिखित, प्रमोद देशमुख दिग्दर्शित “फायनल ड्राफ्ट” १० मार्च रोजी शुभंकरोती फौंडेशन नांदेडच्या वतीने किरण पोत्रेकर लिखित, किरण चौधरी दिग्दर्शित “एक परी” ११ मार्च रोजी ज्ञानसंवर्धन शिक्षण प्रसारक मंडळ, नांदेडच्यावतीने राहुल जोंधळे लिखित, दिग्दर्शित “जय भीम निळा सलाम” १२ मार्च रोज शाक्य सर्वांगीण विकास प्रतिष्ठान परभणीच्या वतीने, नारायण जाधव लिखित, सुनील ढवळे दिग्दर्शित “यशोधरा”, १३ मार्च रोजी तन्मय ग्रुप नांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखित, दिग्दर्शित “२८ युगांपासून मी एकटी” आणि १४ मार्च रोजी झपूर्झा फौंडेशन परभणीच्या वतीने विनोद डावरे लिखित, दिग्दर्शित “अस्वस्थ वल्ली” या नाट्य प्रयोगांचे सादरीकरण होणार आहे.  


कोरोनाच्या काळामुळे गत वर्षी स्पर्धेचे आयोजन झाले नाही. याही वर्षी कोरोनाचे सावट लक्षात घेता नाट्य स्पर्धा कोरोना विषयक सर्व नियम पाळून संपन्न होणार आहे. नांदेड शहरातील रसिक प्रेक्षकांनी नेहमीच कलावंताना प्रोत्साहन दिले आहे. या हौशी मराठी नाटय स्पर्धेला व नाटय कलावंताना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन नांदेड केंद्रावरील समन्वयक दिनेश कवडे यांनी केली आहे.


No comments:

Post a Comment

Pages