अ‍ॅट्रॉसीटी अ‍ॅक्ट संरक्षण समिती अध्यक्षपदी सुरेशदादा गायकवाड तर महासचिवपदी सतीश कावडे यांची निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 2 February 2022

अ‍ॅट्रॉसीटी अ‍ॅक्ट संरक्षण समिती अध्यक्षपदी सुरेशदादा गायकवाड तर महासचिवपदी सतीश कावडे यांची निवड

नांदेड/प्रतिनिधी 

अनुसूचित जाती जमातीच्या संरक्षणासाठी निर्माण करण्यात आलेला अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसीटी अ‍ॅक्ट) कमजोर करण्याचा डाव राज्य शासनाने आखल्याचे नुकतेच निदर्शनास आले असल्याने सदरील कायद्याच्या संरक्षणासाठी व समाजावरील अन्याय अत्याचारा विषयी न्याय मागण्यासाठी लोकशाही पद्धतीने विविध प्रकारे आंदोलन उभे करण्यासाठी अनुसूचित जाती जमातीच्या अनेक सामाजिक व राजकीय संघटनांच्या पुढाकारातून नांदेड येथे अ‍ॅट्रॉसीटी अ‍ॅक्ट संरक्षण समन्वय समितीची स्थापना करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड यांची तर महासचिवपदी सतीश कावडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत दाखल होणार्‍या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकार्‍यामार्फत केला जायचा. परंतु दि. 10 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या गृहविभागाने तो तपास पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक यांनी करावा, असे पत्रक काढले आहे. यातून सदरील कायदा कमकुवत करून अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना न्यायापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव आखल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. हा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी व अ‍ॅट्रॉसीटी अ‍ॅक्टच्या संरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन उभे करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. याच अनुषंगाने दि. 30 जानेवारी 2022 रोजी सहयोगनगर, नांदेड येथे विविध सामाजिक संघटना, पक्ष, समाजसेवी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक व्यापक बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय प्रजासत्ताक पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड हे होते. अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे, गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देेगलूरकर, ज्येष्ठ नेते दिगंबर मोरे, लोकस्वराज्य आंदोलनचे नेते प्रा. रामचंद्र भरांडे, सीपीआयचे नेते कॉ. गंगाधर गायकवाड, एमआयएमचे नेते माजी नगरसेवक श्रीकांत गायकवाड, मनपा सेवानिवृत्त सहायक आयुक्त प्रकाश येवले, प्रा. देवीदास मनोहरे, प्रा. विठ्ठल भंडारे, सौ. बबीताताई पोटफोडे, आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी दिगंबर मोरे यांनी प्रास्ताविकातून बैठकीची पार्श्वभूमी विषद केली. यावेळी मनपाचे सेवानिवृत्त सहायक आयुक्त प्रकाश येवले, पी.एस. गवळे, माजी नगरसेवक श्रीकांत गायकवाड, जे. डी. कवडे, नंदकुमार बनसोडे, जी.जे. नरवाडे, रंजित बार्‍हाळीकर, संपादक उत्तम बाभळे, शिवाजी नरुंदे, पिराजी गाढेकर, सुरेश कांबळे, स्वप्नील वाडेकर, मारोतराव चौदंते, अ‍ॅड. एम. जी. बादलगावकर, बी. बी. पवार, एस. पी. राखे, इंजी. अशोक गायकवाड, इंजी. शिरसे, सिध्दोधन एंगडे, सिद्धोधन जोंधळे, चंद्रकांत भालेराव, मोहन लांडगे, डी. सी. जाधव, राम पाईकराव, मनोज वाघमारे, गौतम पवार, बी. एम. पोटफोडे, एन. जे. गायकवाड, व्ही. पी. वाघमारे, फौजी भीमराव वाघमारे, डॉ. भीमराव वनंजे, कामगार नेते सुमेध बनसोडे, एस. डी. दामोधर, प्रा. गोविनवाड, बालाजी पाटोळे, आकाश सोनटक्के, कॉ. इरवंत गायकवाड, आनंद वंजारे, पांडूरंग शिंदे, दिगांबर वनंजे, अर्जुन रायबोळे, बापुसाहेब सावंत, चंद्रमुनी कांबळे, भगवान गायकवाड, महेंद्र पिंपळगावकर, पत्रकार दत्ताहारी धोत्रे, गौतम मस्के, गंगाधर बसवंते, विजय गोडबोले, जनार्दन जमदाडे, प्रकाश लांडगे,संदीप मोरे, शिलरत्न चावरे, प्रसेनजित मांजरमकर, संजय बोकेफोडे, ग्यानोबा नरवाडे, बापूराव हनमंते, रमेश सूर्यवंशी, जयसर पोटफोडे, बळीराम पोटफोडे, विशाल सोनकांबळे, राहुल तारु, दिगांबर सोनकांबळे, दयानंद वाघमारे,मच्छिंद्र गवाले, भारत खडते, अ‍ॅड. बी. एम. गायकवाड, मोहन लांडगे, साहेबराव नरवाडे, विजय पावळे यासह अनेकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन परमेश्वर बंडेवार यांनी केले. आभार संपादक उत्तम बाभळे यांनी मानले


No comments:

Post a Comment

Pages