जागतिक महिला दिनानिमित्त अंनिसचा कार्यक्रम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 9 March 2022

जागतिक महिला दिनानिमित्त अंनिसचा कार्यक्रम

नांदेड,दि.९: शरदचंद्र महाविद्याल, नायगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जागतिक महिला दिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग आणि महिला समितीच्या संयुक्त विद्यमाने दि.८ मार्च रोजी सकाळी ११:३० वा संपन्न झाला. या कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सम्राट हटकर, नायगाव शाखेचे अध्यक्ष तथा माजी प्राचार्य व ह. स. खंडगावकर आणि शंकरराव खरात यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमात प्राचार्य डॉ.के. हरीबाबू यांनी महिला दिनानिमित्त आपले विचार मांडले. प्रा.डॉ.एस एस शिंदे, प्रा.डॉ. संजीवनी वाडेकर, प्रा.डॉ. महानंदा राऊतखेडकर, प्रा. मनिषा पांगरकर, प्रा. कु.श्रीनिजा सूत्रसंचालन डॉ.गड्डमवार यांनी केले, तर प्रा.डॉ.एस एस शिंदे मॅडम यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील महिला व पुरुष प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.No comments:

Post a Comment

Pages