उदगीर येथे होणार्‍या 16 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलानाच्या अध्यक्षपदी विद्रोही कवी भाषांतरकार, संपादकbव चित्रकार गणेश विसपुते यांची निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 9 March 2022

उदगीर येथे होणार्‍या 16 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलानाच्या अध्यक्षपदी विद्रोही कवी भाषांतरकार, संपादकbव चित्रकार गणेश विसपुते यांची निवड

औरंगाबाद, दि.9 : दि. 23 आणि 24  एप्रिल 2022  रोजी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने 16 वे विद्रोही साहित्य संमेलन उदगीर येथे पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कवी, भाषांतरकार, संपादक व चित्रकार गणेश विसपुते यांची निवड करण्यात आली आहे.

         Bb सिनार, धुवांधार गजबजलेल्या रस्त्याच्या मधोमध, आवाज नष्ट होत नाहीत हे त्यांचे गाजलेले कविता संग्रह आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचांवरून कविता वाचन त्यांनी केले आहे. निरिहयात्रा हा त्यांंचा ललित लेखसंग्रह असून  शिक्षणतज्ञ कृष्ण कुमार , विद्रोही कवी उदय प्रकाश, देवीप्रसाद मिश्र यांच्या कविता, कथा, पुस्तकांचे भाषांतर त्यांनी केलेले आहे, करीत आहेत. 

              भारतीय आणि विदेशी भाषांतील अनेक कवींच्या कवितांची भाषांतरे त्यांनी केली आहेत. त्यांच्या कवितांची हिंदी, कन्नड व इंग्रजीत भाषांतरे प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांची हिंदी, उर्दू व इंग्रजीतून मराठीत केलेल्या साहित्याची भाषांतरं प्रकाशित झाली आहेत.

सांस्कृतिक दहशतवाद, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी या विरोधात त्यांनी नेहमी ठाम भूमिका घेतली आहे.

               2015 साली देशातील वाढत चाललेल्या असहिष्णुतेच्या विरोधात ते अग्रेसर होते. या वाढत्या  असहिष्णुतेच्या विरोधात निषेध म्हणून शासनाचे पुरस्कार परत करणार्‍यांमध्ये त्यांचा समावेश होता. शालेय आणि महाविद्यालयीन  काळात त्यांनी  वृत्तपत्रांत आणि आकाशवाणी मध्ये काम केले.


गणेश विसपुते चरित्र सामग्री:

नावः गणेश रघुनाथ विसपुते, कवी, भाषांतरकार, संपादक व चित्रकार

जन्मः औरंगाबाद, 23 ऑक्टोबर 1963, पत्ताः सध्या वास्तव्यःपुणे येथे.

शिक्षणः - प्राथमिक आणि शालेय शिक्षण औरंगाबाद येथे.

- स्थापत्य अभियांत्रिकी,

- फ्रेंच भाषेत पदविका,

- फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथे चित्रपट रसास्वाद अभ्यासवर्ग.

- छायाचित्रण अभ्यास पदविका, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे


प्रकाशित पुस्तकेः

कवितासंग्रहः

1) सिनार साकेत प्रकाशन, औरंगाबाद, 1982.

2) धुवांधार गजबजलेल्या रस्त्याच्या मधोमध, अनन्य प्रकाशन, पुणे, 1999

3) आवाज नष्ट होत नाहीत, लोकवाङमय प्रकाशन, मुंबई, 2010

ललित लेखसंग्रहः

निरिहयात्रा, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, 1990.

भाषांतरे:

1) शासन, समाजआणिशिक्षण, कृष्णकुमारयांच्यापुस्तकाचाअनुवाद, लोकवाङमय प्रकाशन, मुंबई, 2007

2) पिवळ्या धम्मक छत्रीतली मुलगी, उदय प्रकाश यांच्या लघुकादंबरीचा अनुवाद, लोकवाङमय प्रकाशन, मुंबई, 2010

3) माय नेम इज रेड, ओरहान पामुक यांच्या कादंबरीचा अनुवाद, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, 2014.

4) देवीप्रसाद मिश्र यांच्या अन्य कथा (आगामी)

संपादनः पुष्पाभावेःविचारआणिवारसा, 2021, (वैशाली रोडे यांचेसह)


वेळोवेळीचे भाषिक-वाङ्मयीन स्ंस्थात्मक कार्यः

मायमावशी या भाषांतरविषयक नियतकालिकाचा संपादक

कार्याध्यक्ष, आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र, मुंबई

साहित्य अकादेमीच्या भाषांतरित वाङमय-पुरस्कार निवड समितीचा सदस्य.

महाराष्ट्र राज्य वाङमय-पुरस्कार निवड समितीचा सदस्य.

 मध्यप्रदेश शासनाच्या भा. रा. तांबे वाङमय पुरस्कार निवड समितीचा सदस्य.

 यशवंतराव चव्हाण सेंटरद्वारे देण्यात येणार्‍या पाठ्यवृत्तीसाठीच्या निवड समितीचा सदस्य.

 गेली चाळीस वर्षे मराठीतील विविध नियतकालिकांतून तसेच हिंदी नियतकालिकांतूनही कविता,    संस्कृती, कला व चित्रपटविषयक तसेच भाषांतरविषयक लेखन प्रकाशित.

 भारतीय आणि विदेशी भाषांतील अनेक कवींच्या कवितांची भाषांतरे प्रकाशित. त्यांच्या कवितांची  हिंदी, कन्नड व इंग्रजीत भाषांतरे प्रसिद्ध झालेली आहेत. हिंदी, उर्दू व इंग्रजीतून मराठीत केलेल्या         साहित्याची भाषांतरं प्रकाशित.

 स्वातंत्र्योत्तर मराठी कविता (नॅशनलबुकट्रस्ट,नवी दिल्ली) व पोस्टइंडिपेन्डन्स मराठी पोएट्री (साहित्य    अकादेमी, नवी दिल्ली) या संग्रहांमध्ये त्यांच्या कवितांचा समावेश.

 विविध नियतकालिकांतून गेली 35 वर्षे काही वाङमयीन नियतकालिकांचं अतिथी संपादन.

विविध ग्रंथांना प्रस्तावना.

 बिर्लाअकॅडमी, कोलकाता व पुणे येथे त्यांच्या चित्रांची स्वतंत्र प्रदर्शने झालेली आहेत.

 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचांवरून कवितांचं वाचन.

बोडोलँन्ड, दिल्ली, डेहराडून, हैदराबाद आणि भारतात विविध ठिकाणी कविता आणि कविताविषयक कार्यक्रमांत तसेच चर्चासत्रांत सहभाग.

कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय कविता महोत्सवामध्ये सहभाग.

  युरोपातील काही देश तसेच अमेरिकेत प्रवास.

* अध्यक्ष, सह्याद्री कविता महोत्सव, औरंगाबाद 2021


पुरस्कारः


1) पु. शि. रेगेपुरस्कार, अनुष्ठुभ्, 1981,

2) महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमयनिर्मिती पुरस्कार, 1992,

3) ऊन्वय फाउंडेशन पुरस्कार, पुणे, 1999,

4) मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा अनंत काणेकर पुरस्कार, 2001,

5) कवी शैलेन्द्र पुरस्कार, 2000,

6) रायहरिश्चन्द्र साहनी दुखीकाव्य पुरस्कार, 2000,

7) बाळकृष्णशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार (साने गुरुजी स्मारक ट्रस्ट), ऑगस्ट2015,

8) कोपर्डे प्रतिष्ठानचा डॉ. चंद्रशेखर जहागिरदार स्मृती संस्कृती पुरस्कार, 2020. इ. इ.


व्यावसायिक कारकीर्दः


शालेय आणि महाविद्यालयीन काळात वृत्तपत्रांत आणि आकाशवाणीमध्ये काम

 महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात स्थापत्य अभियंता म्हणून पंचवीस वर्षे काम. 2014मध्ये   स्वेच्छा निवृत्ती घेतली.  

 2015 साली देशातील वाढत चाललेल्या असहुष्णतेच्या विरोधात निषेध म्हणून शासनाचे पुरस्कार   परत केले. याच कारणांसाठी देशभरातील साहित्यिक दक्षिणायन चळवळीत एकत्र आले होते.     त्यावेळी गुजरात मधील दांडीपासून धारवाड पर्यंतच्या यात्रेत सहभाग.

अशी माहिती आज औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष डॉ. अंजुम कादरी, प्रा. भारत सिरसाठ, अनंत भवरे, अहमद सरवर, सिध्देश्वर लांडगे, श्रीनिवास एकुर्लेकर, अमोल सिरसाठ यांनी दिली आहे. यावेळी आंतरराज्यीय विद्रोही संमेलनाच्या पूर्वाध्यक्ष डॉ. प्रतिभा अहिरे, चित्रकार राजानंद सुरडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages