कृष्णुर येथे केंद्र स्तरीय शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 26 March 2022

कृष्णुर येथे केंद्र स्तरीय शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण संपन्न

नायगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कृष्णुर येथे केंद्र स्तरीय शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण मोठ्या उत्साहात संपन्न झाले असुन.यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ सविता बिरगे यांच्या समवेत तालुका गटशिक्षणाधिकारी श्री अशोक पवळे,शिक्षण विस्तार अधिकारी सौ कौठेकर मॅडम यांनी भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.शिक्षणाधिकारी सौ.सविता बिरगे यांनी येणाऱ्या काळामध्ये शाळा पूर्वतयारीच्या दृष्टीने चार आठवड्यातील नियोजनबद्ध कार्यक्रम कशा पद्धतीने घ्यायचा विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाच्या प्रवाह मध्ये कसे आणायचे याविषयीचे सविस्तर मार्गदर्शन केले तसेच शाळा व परिसर पाहून समाधान व्यक्त केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रप्रमुख श्री उध्दव ढगे यांचे विशेष अभिनंदन केले , केंद्रातील नाविण्यपूर्ण उपक्रमाचा आढावा घेऊन यामध्ये ५ वी स्कॉलरशिप सराव पेपर घेऊन विद्यार्थ्यांना स्वतः प्रश्नपत्रिका स्वखर्चातून देत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले हा उपक्रम जिल्हास्तरावर राबवण्यात सारखा आहे असे मत याप्रसंगी सौ.बीरगे यांनी मत व्यक्त केले,यावेळी केंद्रातून इयत्ता पहिली ते पाचवी चे सर्व शिक्षक त्याचबरोबर अंगणवाडी कार्यकर्ता व मदतनीस यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न झाला असुन.केंद्रातील तालुका गुरू गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान करणे असो वा संस्कृत सारखा विषय शिकवणे या सर्व आघाडीवर केंद्रप्रमुख यांनी पुढाकार घेऊन केलेल्या कार्यक्रमाचं त्यांनी कौतुकही केले त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांनी या चार आठवड्यामध्ये पूर्णवेळ शाळा घेऊन येणाऱ्या बालकांचे स्वागत मोठ्या उत्साहात मध्ये करून बालक आणि पालक यांना या शिक्षणाच्या प्रवाह मध्ये जोडण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावं अशी या प्रसंगी सूचना केली.या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विषयतज्ञ बालाजी किसवे व भाऊसाहेब वडजे यांनी चार आठवड्यामध्ये काय उपक्रम राबवायचे या विषयीची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली तसेच गटशिक्षणाधिकारी श्री पवळे सर यांनी येणाऱ्या काळामध्ये शिक्षक आणि अंगणवाडी कार्यकर्ता यांनी  संयुक्तरीत्या बाल विकासासाठी कार्यरत राहण्यासाठी दोन्ही स्तरावर चे प्रयत्न महत्त्वपूर्ण आहेत असे नमूद केले.याप्रसंगी कौठेकर मॅडम विस्तार अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय मुख्याध्यापक श्री वारघडे सर यांनी केले तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तंत्रस्नेही शिक्षक देविदास जमदाडे  यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ.योजना मरेवार यांनी व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Pages