कायदा सुव्यवस्था अबधित राखण्‌यासाठी अत्याधुनिक साधनांचा उपयोग महत्वपूर्ण : उद्योगमंत्री सुभाष देसाई - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 26 March 2022

कायदा सुव्यवस्था अबधित राखण्‌यासाठी अत्याधुनिक साधनांचा उपयोग महत्वपूर्ण : उद्योगमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद, दिनांक 26  : पोलिसांना गतीमान तपासासाठी तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अत्याधुनिक साधनांचा उपयोग पोलीस दलात करीत गुन्हेगारांच्या मनात दहशत आणि सर्वसामान्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्याच काम पोलीस दलाने करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले. पोलीस दलात नवीन 15 बोलेरो निवो या चारचाकी वाहनांचा समावेश तसेच सभागृहाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक कार्यालय आवारातील कार्यक्रमात पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक निमित गोयल तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. 

दिवसेंदिवस समाजातील वाढत्या घटनामुळे पोलीस यंत्रणेत तपासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करित गुन्हेगाराला शिक्षा आणि सर्वसामान्य जनेतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी विविध साधनसामग्रीचा उपयोग अनिवार्य झाला आहे. याचाच भाग म्हणून औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नवीन अत्याधुनिक नव्या 15 बोलेरो निवो या चारचाकी वाहनांचा समावेश पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. 


No comments:

Post a Comment

Pages