भिमजयंतीवरील सर्व निर्बंध मागे घेण्याची मागणी ; आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 22 March 2022

भिमजयंतीवरील सर्व निर्बंध मागे घेण्याची मागणी ; आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

औरंगाबाद  दि.२२:  आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण ह्यांच्या मार्फत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती करीता कुठलेही निर्बंध न लावता सार्वजनिक रित्या जयंती साजरी करण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी असलेले निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.


  महामानव डॉ.बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये जवळपास 3 वर्षाचा खंड पडल्याने ह्या वर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचा उत्साह आंबेडकरी जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात असून  औरंगाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाला असून रुग्ण संख्येचे प्रमाणही अत्यन्त नगण्य असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.


आंबेडकर जयंती च्या वेळेसच शासन प्रशासन निर्बंध लादत असल्याची भावना आंबेडकरी समुदयामध्ये असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

   प्रसार माध्यमातुन कोरोनाची चौथी लाट येणार असल्याची भविष्यवाणी वर्तवण्यात आल्याने पुन्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या वेळेवरच निर्बंध लावण्यात येणाची शंका येत असल्याने आंबेडकरी जनतेमध्ये शासन - प्रशासनाच्या भूमिकेविषयी रोष निर्माण झाला असून भीमजयंती ला कुठलेही निर्बंध लावू नये ह्या बाबत आंबेडकरी जनता आग्रही असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.


या पूर्वी कोरोनाच्या विळख्यात महाराष्ट्र सापडलेला असताना आंबेडकरी जनतेने अत्यंत संयमाने शासन-प्रशासनास सहकार्य करून घरातूनच आंबेडकर जयंती साजरी केली परंतु ह्या वर्षी आंबेडकरी जनतेचा उत्साह बघता कोणत्याही परिस्थितीत जयंती साजरी करण्याचा निर्धार केला आहे.


शासनाने आंबेडकरी जनतेच्या भावना लक्षात घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पूर्वीप्रमाणे वाद्यवृंदासह मिरवणूक,सांस्कृतिक कार्यक्रम व सामुदायिक अभिवादन  सार्वजनिक रित्या करणेसाठी कोरोना महामारीचे कोणतेही निर्बंध लादण्यात येऊ नये अन्यथा आंबेडकरी जनता सर्व निर्बंध झुगारून जयंती साजरी केल्या शिवाय राहणार नाही असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण ह्यांनी शिष्टमंडळाच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत कोविड काळात केलेल्या सहकार्या प्रमाणेच आंबेडकरी समुदायाने असेच सहकार्य करून भीमजयंती साजरी करावी असे आवाहनही केले.


यावेळी श्रावण गायकवाड,मिलिंद दाभाडे,कृष्णा बनकर ,विजयकुमार खंडागळे,राजू अमराव,कैलास गायकवाड,बंडू कांबळे,शांतीलाल गायकवाड,सर्जेराव मनोरे,नानासाहेब म्हस्के,प्रकाश गायकवाड, ऍड.धनंजय बोरडे,आनंद कस्तुरे,प्रा.सिद्बोधन मोरे, बलराज दाभाडे,दिलीप पाडमुख,सचिन निकम,संजय सातपुते,मिलिंद बनसोडे,रतनकुमार साळवे,अंजन साळवे,दीपक निकाळजे, शैलेंद्र मिसाळ,वसंत वक्ते,गुणरत्न सोनवणे, राहुल वडमारे,ऍड अतुल कांबळे,आनंद बोर्डे,सोमु भटकर,दिनेश नवगिरे,पृथ्वी गडवे, संजय चिकसे, प्रभू कटारे, प्रवीण बोर्डे,प्रेम चव्हाण,नितीन दाभाडे,शैलेंद्र झाल्टे,राहुल गायकवाड, नितीन गायकवाड,विजय मोरे,दिपक दाभाडे,बाळू गंगावणे,अक्षय शेजुळ ,किरण साळवे,धम्मा बनसोडे,सागर चक्रनारायन आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages