नांदेड, दि. 21 : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 या कायदयान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या सेवा नागरिकांपर्यंत पोहविण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने आपल्या कार्यालयातील पोर्टल अपडेट ठेवणे आवश्यक आहे. कुठल्याही माहिती पासून नागरिक वंचित राहणार नाहीत याची दक्षता सर्व विभागप्रमुख यांनी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिले.
नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, मनपा आयुक्त सुनील लहाने तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात एकूण 1310 ग्रामपंचायती असून 1596 गावे असून यापैकी 796 ठिकाणी आपले सरकार केंद्र स्थापित करून सेवा पुरविण्यात आल्या आहेत. शहरी भागामध्ये 265 केंद्र स्थापित करण्यात आली आहे.लोकसेवा अधिनियम 2015 नुसार शासनाच्या विविध विभागाच्या एकुण 420 सेवा आपले सरकार व्दारे नागरिकांना सेवा पुरवित आहेत.या सेवे अंतर्गत शाळा/महाविद्यालयामध्ये कॅम्प आयोजित करून विद्यार्थ्यांना एकच वेळी एकाच ठिकाणी जात, रहिवाशी प्रमाणपत्र, उत्पनाचे प्रमाणपत्र त उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
No comments:
Post a Comment