स्वामित्व योजनेअंतर्गत जानापुरी येथे सनदांचे वितरण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 24 March 2022

स्वामित्व योजनेअंतर्गत जानापुरी येथे सनदांचे वितरण

नांदेड  दि. 24 :- स्वामित्व योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या मिळकतीच्या सनदांचे वितरण लोहा तालुक्यातील जानापुरी येथे करण्यात आले. सनद वितरणाचा कार्यक्रम औरंगाबादचे उपसंचालक भूमि अभिलेख, अनिल माने व जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख सुरेखा सेठीया यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी गावातील 10 मिळकत धारकांना सनद वाटप करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयामार्फत गावातील घरांचे नकाशे व कायदेशीर कागद मिळाल्यामुळे लोकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सरपंच दादाराव गच्चे व उपसरपंच संतोष कदम जानापुरीकर तसेच भूमि अभिलेख विभागाचे अधिकारी  पी. आर. माळी, एन. आर. उंडे व कर्मचारी राजु दळवी, गिरीष अंबेकर, श्री. डफडे, ए. के. ढाके, एन. एच. पिंपळगावकर, श्री. नलमेलवार, श्री कागणे व गटविकास अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.


0000

No comments:

Post a Comment

Pages