नांदेड - दहावीत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या अनुसूचित जाती आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी ने 'भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना' सुरू केली. या योजनेसाठी राज्यभरातील जवळपास चार हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले. परंतु 'बार्टी' ने गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांची यादी जाहीर न केल्यामुळे विद्यार्थी व पालक कोंडीत सापडले आहेत.
सरकार शिकवणीचा खर्च उचलेल या अपेक्षेने अनुसूचित जातीतील गुणवंत तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी एमएच-सीईटी, जेईई, नीट, मेडिकल, यासारख्या परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी दोन लाख रुपयांची मदत होणार असल्याने विद्यार्थ्यांनी खाजगी शिकवणी देखील लावली. शासनाने पैसे न दिल्यास हा खर्च कसा उचलावा असा प्रश्न पालकांना पडला आहे.
तरी या योजनेची लाभार्थ्यांची यादी लवकरात लवकर जाहीर करून विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी युवा नेते शुद्धोधन कापसीकर यांनी बार्टी चे महाव्यवस्थापक धम्मज्योती गजभिये यांच्याकडे केली आहे.
No comments:
Post a Comment