५०० नागरिकांच्या डोळ्याची मोफत तपासणी; चारशे रुग्णांना चष्म्यांचे वाटप : अंजनवाडा सरपंच किरण घोंगडे यांचा पुढाकार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 23 March 2022

५०० नागरिकांच्या डोळ्याची मोफत तपासणी; चारशे रुग्णांना चष्म्यांचे वाटप : अंजनवाडा सरपंच किरण घोंगडे यांचा पुढाकार


औंढा नागनाथ : तालुक्यातील मौजे अंजनवाडा येथे बुधवारी गावचे सरपंच  तथा रिपब्लिकन युवासेना प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या पुढाकाराने नेत्रतपासणी शिबिर घेऊन गावातील ५०० नागरिकांच्या डोळ्याच्यां तपासण्या करण्यात आल्या यात ४०० रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आले तर ३० वर वयोवृद्ध नागरिकांच्या डोळ्यांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यांना वाहनाद्वारे शस्त्रक्रियेसाठी बाहेरगावी पाठविण्यात आले.


सदरील शिबिराचे आयोजन प्रीतम सरकटे सेवा प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली गावचे सरपंच तथा रिपब्लिकन युवासेना प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांनी केले होते दरम्यान घरोघरी जाऊन घोंगडे यांनी वयोवृद्ध महिला व पुरुषांना शिबिर स्थळी आणून तपासणी करून घेतल्या त्यामुळे म्हाताऱ्या व डोळ्याने अपंग असलेल्या वृद्धांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते.

डॉ अनुराग क्षीरसागर यांनी नागरिकांच्या डोळ्याची तपासणी केली यावे यावेळी युवा नेते प्रीतम सरकटे रिपब्लिकन युवा सेना प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे, उपसरपंच उत्तम चव्हाण ग्रामपंचायत सदस्य पंजाब राठोड,धोंडीबा काचगुंडे,सटवाजी गारुळे,हनवता शिंदे, जनार्दन घोंगडे, कैलास घोंगडे,पांडुरंग राठोड,अनिल राठोड, महेंद्र घोंगडे,डिंगाबंर घोंगडे, यांनी परिश्रम घेतले.



No comments:

Post a Comment

Pages