प्रा. संध्या रंगारी यांच्या ' वाताहतीची कैफियत ' या कवितासंग्रहास राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 23 March 2022

प्रा. संध्या रंगारी यांच्या ' वाताहतीची कैफियत ' या कवितासंग्रहास राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

हिंगोली :

प्रसिद्ध कवयित्री , ललित लेखिका प्रा. संध्या रंगारी यांना त्यांच्या ' वाताहतीची कैफियत ' या कविता संग्रहासाठी " ज्योती लांजेवार राज्यस्तरीय काव्य पुरस्कार " जाहीर झाला आहे. आखाडा बाळापूर येथील नारायणराव वाघमारे महाविद्यालयात कार्यरत असलेल्या मराठी विषयाच्या प्राध्यापिका तथा कवयित्री संध्या रंगारी यांच्या " वाताहतीची कैफियत " या कवितासंग्रहासाठी " ज्योती लांजेवार राज्यस्तरीय काव्य पुरस्कार " जाहीर करण्यात आला आहे. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ यांच्या वतीने उत्कृष्ट साहित्यासाठीचे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. 27 मार्च रोजी  दीक्षाभूमी नागपूर येथील ऑडिटोरियम सभागॄहात राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत व इतर मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा.दीपककुमार खोब्रागडे , कार्याध्यक्ष डॉ. गोविंदराव कांबळे, कार्यवाह डॉ. रवींद्र तिरपुडे , सरचिटणीस सुजित मुरमाडे यांनी पत्राद्वारे कळविले आहे. प्रा. संध्या रंगारी यांना यापूर्वीही अनेक साहित्य सन्मान प्राप्त झाले असून 'वाताहतीची कैफियत' या कविता संग्रहासाठी हा चौदावा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. कृष्णराव पाटील जरोडेकर, प्राचार्य डॉ. दिगंबर मोरे, सर्व प्राध्यापक व साहित्य प्रेमींनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages