औरंगाबाद:
सत्यशोधक विद्यार्थी संघटना यांच्या वतीने 23 मार्च शहीद वीरांना फाशी देण्यात आली होती, त्यांचे स्मरण व्हावें, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठ शहीद भगतसिंह मुलांचे वस्तीगृह क्रमांक 5 येथे सर्व विद्यार्थी एकत्र येऊन वीरांच्या स्मृतीस अभिवादन केले.
यावेळी उपस्थित अध्यक्ष म्हणून बी.जे.जाधव वस्तीग्रह निरीक्षक उपस्थित होते तर सत्यशोधक विद्यार्थी संघटनाचे प्रदेश अध्यक्ष अमोल खरात, यांनी अस्पृश्य समाज आजची अवस्था ,युवा वर्ग आजचे राजकारण, 21 व्या शतकातील सोशल मीडियावर बिझी असलेला आजचा युवक या विषयावर मुद्दे मांडले तर SFI चे जिल्हा अध्यक्ष लोकेश कांबळे, यांनी आजचा विद्यार्थी शिक्षणापासून कसा वंचित आहे विद्यार्थ्यांच्या विविध समस्या आणि विद्यार्थ्यांना विविध सरकारी शिष्यवृत्ती योजनांपासून कसे दूर ठेवले जात आहेत यावर भाष्य केले. NSUI योगेश बहादुरे , सत्यशोधक विद्यार्थी संघटना राज्य संघटक सुरेश सानप, अविनाश सीताफुले, सत्यशोधक विद्यार्थी संघटना विद्यापीठ अध्यक्ष श्रद्धा खरात, सोनू मीरासे ,मनीषा बल्लाळ, जयेश पटाडे, दीपक पगारे, महेश टोकरे,विकास इकर ,भीमराव मोठे, कृष्णा हजारे, बजरंग वाकोडे ,सह वस्तीगृह चे विद्यार्थी आणि कार्यकर्त उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात गणेश बिरुटे यांच्या गीताने झाली.तर सूत्रसंचालन निशिकांत कांबळे यांनी केले.
No comments:
Post a Comment