नांदेड : राज्यातील सहकार क्षेत्रात भरीव योगदान देत सहकार बळकट करणाऱ्या गोदावरी अर्बनला अविज पब्लिकेशन च्या वतीने सलग सहाव्यांदा बँको पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या पुरस्कार सोहळ्याचे वितरण लगूना रिसॉर्ट,लोणावळा येथे संपन्न झाले असून जेष्ठ विधीज्ञ प्रल्हाद कोकरे , उपाध्यक्ष काॅसमाॅस बॅंक पुणे , अविनाश जोशी निवृत्त जेष्ठ अधिकारी भारतीय रिझर्व्ह बँक , मुंबई , शांताराम भालेराव जेष्ठ अधिकारी भारतीय रिझर्व्ह बँक , अतुल खीरवाडकर मुख्य कार्यकारी अधिकारी , कल्याण जनता सहकारी बँक मुंबई , अशोक नाईक , अविनाश शिंत्रे संचालक बॅंको , इत्यादी मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, संचालक अजय देशमुख सरसमकर , मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे,मुख्यालय अधिक्षक विजय शिरमेवार,वरिष्ठ व्यवस्थापक रवी इंगळे,शाखा व्यवस्थापक भरत राठोड यांना देण्यात आला.
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला बळकटी देणाऱ्या संस्थाना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने अविज पब्लिकेशन व गॅलक्सी इग्मा पुणे यांच्या वतीने राज्यातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेची रिझर्व्ह बँकेच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या समिती द्वारे अत्यंत कठीण निकषांच्या आधारे माहिती घेऊन परिक्षण केले जाते.या सर्व निकषात गोदावरी अर्बन अव्वल ठरली त्यामुळे सलग सहाव्यांदा बँको पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.गोदावरी अर्बन ही संस्था महाराष्ट्र,आंध्रप्रदेश,तेलगांणा, कर्नाटक व गुजरात या पाच राज्यात काम करीत आहे.संस्थेने आपल्या सर्वच शाखा सुसज्ज व संगणिकृत केल्या असून ग्राहकांना आरटीजीस,एनफटी, मोबाईल बँकिंग,एटीम,क्यूआर कोड अशा सर्व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोयी आपल्या ग्राहकांना देत आहे.सर्वच शाखांमध्ये अत्यंत उच्चविद्याविभूषित कर्मचारी वृंद ग्राहकांना आपली सेवा देण्यास सदैव तत्पर असतात.
गोदावरी अर्बन बँको पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक खासदार हेमंत पाटील अध्यक्ष राजश्री पाटील व समस्त संचालक मंडळांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत अभिनंदन केले.तर अविज पब्लिक केशनचे आभार मानले.या सोहळ्यास सहाय्यक व्यस्थापक चंद्रशेखर शिंदे,प्रशांत कदम,मुकुल पांडे,धम्मपाल निमसरकर,मुकेश नाकडे, उमाकांत जंगले,अंकुश बिबेकर, विजय मोडक, नवीन जोगा,बालाराम वंगाला,वेणूगोपाल कैलास जाधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment