तळागाळातील युवकांनी उद्योगाकडे वळावे : रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 9 March 2022

तळागाळातील युवकांनी उद्योगाकडे वळावे : रामदास आठवले

मुंबई, दि. 9 :

तळागाळातील युवकांनी उद्योगाकडे वळावे, असे प्रतिपादन केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. ट्रान्सग्लोबल एंटरप्युनअर चेंबर आँफ काँमर्स इंडस्ट्रिज अँन्ड अँग्रिकल्चरच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या स्पंधन अर्बन निधी लि. या आर्थिक कंपनीचे उद्घाटन आठवले यांनी केले, त्यावेळी ते बोलत होते. ऐरोली चे आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यावेळी उपस्थित होते. हावरे बँकवेट हॉल नंबर २, हावरे फंटासिया बिझनेस पार्क, वाशी रेल्वे स्टेशन समोर, वाशी नवी मुंबई येथे हा सोहळा पार पडला.

मी तुमच्या सोबत कायम आहे

आपल्या संदेशपर भाषणात रामदास आठवले म्हणाले की, मोठा उद्योजक व्हायचे स्वप्न असेल तर छोट्या छोट्या व्यवसायापासून आपण सुरुवात केली पाहिजे.  त्याला निधी हि कमी लागतो आणि नुकसान जास्त नसते. व्यवसायाकडे सर्वांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही ते म्हणाले. चंद्रकांत जगताप हे व्यावसायिक विचाराने चालणारे आहेत त्यामुळे त्यांच्याकडून अनेक उद्योजक घडत असतात.समाजातील अनेकांनी स्पंधन मध्ये गुंतवणूक करून तिच्या अनेकानेक शाखा कशा निर्माण होतील हे पाहणे. केंद्रातून जे मदत लागेल त्यासाठी मी तुमच्या सोबत कायम आहे असा विश्वास दिला. महिलांनी आपला वेळ घरी बसून न घालवता एखादा व्यवसाय केला तर हजारो रुपये दिवसाला कमवू शकतात , असे ते म्हणाले.

सर्वांना मुख्य प्रवाहात आणणार

पुढील काळात संघटित असंघटित,कामगार, महिला बचत गट ,कष्टकरी,शोषित ,पिडीत, बेरोजगार, विद्यार्थी या सर्व समुहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्पंधन अर्बन निधी पुढे आली आहे आणि अशाच वर्गासाठी भविष्यात काम करणार असल्याचे स्पंधनचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जगताप यांनी प्रस्तावनेत सांगितले. 

मीही आपल्या सोबत राहीन

गणेशजी नाईक साहेब यांनी शुभेच्छापर भाषणात संपूर्ण टीमचे अभिनंदन करून भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाने स्पंधन अर्बन निधी मध्ये सभासत होऊन तिला उच्चस्थानापर्यंत पोहचवण्यासाठी हातभार लावूया असे सर्वांना आवाहन केले. माझी जेथे जेथे गरज वाटेल तिथे तिथे मी आपल्याला मी शक्य होईल तितके सहकार्य करेन अशा आशावाद व्यक्त केला.

महिला सक्षमीकरण होईल

पुणे येथून खास कार्यक्रमासाठी आलेल्या सन्मा. सुवर्णाताई डंबाळे यांनी महिलांना उद्देशून बोलताना सांगितले कि महिलांसाठी स्पंधन निधी खूप महत्वपूर्ण ठरेल. महिलांनी छोटे छोटे उद्योग सुरु करत असताना लागणारा निधी देण्याची जबाबदारी स्पंधन नक्कीच पूर्ण करेल असे त्यांनी सांगितले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

महिलांना मोफत आऊटलेटवाटप

ट्रान्सग्लोबल चेम्बरच्या माध्यमातून निर्माण झालेल्या "आपली मासोळी" या व्यवसायाची संधी नवी मुंबईतील सुमारे दहा महिलांना मोफत आउटलेट देण्यात आले,जो व्यवसाय सुरु करण्यासाठी किमान २५ हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागते तो व्यवसाय निधी मार्फत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून व्यवसाची संधी देण्यात आली. आठवले साहेबांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात तुर्भे नवी मुंबई येथील विद्या अजितकुमार सोनावणे यांना आपली मासोळी चे सन्मानपत्र देऊन स्वागत करण्यात आले.


या कार्यक्रमाला सुधाकर सोनावणे (माजी महापौर, नवी मुंबई महानगरपालिका), सिद्राम ओव्हाळ (नवी मुंबई जिल्हाध्यक्ष  - आर.पी.आय.(आठवले) , सूरज पाटील (माजी नगरसेवक,नवी मुंबई महानगरपालिका),  जेष्ट पत्रकार राजा आदाटे, जेष्ट पत्रकार  अरुण लाल, प्रा. कुणाल मेश्राम (अभिनेते), इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages