नांदेड :
येथील आंबेडकरवादी मिशन येथे यू.पी.एस.सी. ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 10 ते 15 मार्च दरम्यान सहा दिवसाचे मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात आले आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून दिल्ली येथील विविध नामांकित क्लासेस मध्ये मार्गदर्शनाचा अनुभव असलेले पंकज कुमार (आय.आय.टी.)कानपुर यांचे सहा दिवसाचे मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे वर्ग सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत सलग दहा ते बारा तास ही होतील.यात ते विविध विषयावर ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
सी सॅट , भूगोल ,विज्ञान व तंत्रज्ञान वरिल मार्गदर्शन वर्गाचा सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आंबेडकरवादी मिशन चे प्रमुख दिपक कदम यांनी केले आहे .
No comments:
Post a Comment