औरंगाबाद - : येथील दिवंगत प्रा.पांडुरंग आठवले यांच्या प्रथम स्मृतीदीनी धम्म भूमी बुद्ध लेणी विहाराच्या परिसरात वृक्ष वाटप, भोजनदान, चिवरदान व वृक्षारोपण करून अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शेषराव इंगळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, यावेळी शेषराव इंगळे यांनी सांगितले की, प्रा. पांडुरंग आठवले हे एक सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व होतं, प्रा.पांडुरंग आठवले सर यांनी, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले, हुशार,जिद्दी, मेहनती व चिकाटी हे गुण प्रा.आठवले सर यांच्या कडून आजच्या पिढीने आत्मसात करणे आवश्यकआहे, आजही प्रा. आठवले सर आपल्या सर्वांमध्ये विचार व कार्याने जिवंत ठेवणे गरजेचे आहे, प्रा.आठवले सर हे मैत्रीचं एक उत्तम व आदर्श उदाहरण होते. त्यांनी संपत्ती पेक्षा माणसं जोडली, माणुसकी जोपासली व बुद्धांनी सांगितलेला मैत्रीभाव प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात उपयोगी आणला, प्रा. आठवले सर यांचं कार्य आपल्याला सदैव प्रेरणा देणारं आहे, पाली भाषेचे अभ्यासक प्रा.डॉ.बाळासाहेब अंभोरे यांनी अभिवादन सभेत आपले विचार मांडतांना सांगितले की, प्रा.आठवले सर हे निगर्वी, प्रामाणिक व लोभ नसलेलं निस्वार्थी सामाजिक बांधिलकी जोपासणारे अध्यापक व कार्यकर्ते होते, अनेक गरजू वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर व कृतीशील प्राध्यापक म्हणून परिचीत होते, आपल्या संघर्षमय काळात त्यांनी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ बाळगला नाही, सदैव लोकोपयोगी कार्य करण्यात आपले आयुष्य खर्ची केले, असेही डॉ.अंभोरे यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी भन्ते महानाम यांनी परित्राण पाठ घेऊन बुद्ध वंदना घेतली,भन्ते बोधीधम्म यांनी दिवंगत प्रा.पांडुरंग आठवले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला,याप्रसंगी शहादेव आठवले, गौकर्णा आठवले, रमेश गोपणारायन,साधना गोपणारायन, डॉ. संजय पाईकराव, डॉ.संघर्ष सावळे, डॉ. मिलिंद आठवले, प्राजक्ता आठवले, अनुराधा इंगळे, जिवीका अंदूरकर,पंकज मेश्राम, प्रमित आठवले,शौर्य आठवले, प्रशिक इंगळे व श्रावस्ती इंगळे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. युवराज आठवले यांनी केले,सूत्रसंचालन प्रवीण दाभाडे यांनी केले तर आभार विशाल आठवले यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदेश धाडसे, अमरदीप हिवराळे, वैभव खंडारे, विकास वाव्हळे व आदर्श सावळे यांनी प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment