जेष्ठ साहित्यीक ज.वी. पवारांना यंदाचा नागसेन गौरव पुरस्कार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 30 March 2022

जेष्ठ साहित्यीक ज.वी. पवारांना यंदाचा नागसेन गौरव पुरस्कार

औरंगाबाद :

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने नागसेनवनातील  माजी विद्यार्थ्यांस देण्यात येणारा मानाचा 'नागसेन गौरव पुरस्कार' यंदा जेष्ठ साहित्यीक ज वि.पवार ह्यांना देण्यात येणार असून दलित पँथरचे सहसंस्थापक, मराठी साहित्यिक, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, भाष्यकार व विचारवंत म्हणून ते देशभरात प्रसिद्ध आहेत.

ते पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून

जागतिक पातळीवर ज्या चळवळीची नोंद झाली ती भारतातील ‘दलित पँथर चळवळ’ तसेच ‘मास मोमेंट’, ‘बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’, ‘रिपब्लिकन चळवळ’, ‘भूमिहीनांची चळवळ’, ‘रिडल्सचा लढा’, ‘मंडल आयोग’, ‘नामांतर आंदोलन’, ‘आंबेडकर भवन’, ‘इंदुमील आंदोलन’, ‘भिमा-कोरेगाव आंदोलन’ ईत्यादि मध्ये त्यांनी आपले मौलिक योगदान दिलेले आहे.


 सामाजिक भान व मूल्यांची जाण असलेले ज. वि. पवार आंबेडकरी चळवळीतील एक ‘माईलस्टोन’ आहेत. आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज. वि. परिवर्तनाच्या चळवळींचा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर जो प्रभाव आहे त्यातील एक महत्त्वाचं स्थान निर्माण करणारे ते एक अभ्यासक आहेत. 


ज. वि. आंबेडकरी चळवळीचे ‘ऊर्जा स्त्रोत’ आहेत. एकूणच ज. विं. च्या चिंतनाचा आवाका फार मोठा आहे. कला, साहित्य, संस्कृती, धर्म, इतिहास, राजकारण, आंदोलन इत्यादी वर ते अधिकारवाणीने मांडणी करतात. त्यांच्या सहवासाने नव साहित्यिकांना व कार्यकर्त्यांना एक प्रेरणा मिळते.


 नागसेन फेस्टिव्हल च्या समारोप प्रसंगी दि.०३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांना नागसेन गौरव पुरस्कार देऊन  लुम्बीनी उद्यान, मिलिंद महाविद्यालय,नागसेनवन,औरंगाबाद येथे गौरविण्यात येणार आहे.

ह्यावेळी जेष्ठ आंबेडकरी शाहीर प्रतापसिंग बोदडे हे त्यांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करतील तर इतिहासकार सर्फराज अहमद,डॉ.उत्तम अंभोरे,डॉ.वाल्मिक सरवदे ह्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

No comments:

Post a Comment

Pages