शैक्षणिक साहित्य वाटप करून पुण्यतिथी साजरी करणे एक कौतुकास्पद उपक्रम- गटशिक्षणाधिकारी अशोक पवळे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 30 March 2022

शैक्षणिक साहित्य वाटप करून पुण्यतिथी साजरी करणे एक कौतुकास्पद उपक्रम- गटशिक्षणाधिकारी अशोक पवळे

नायगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंचोली येथील मुख्याध्यापक उत्तम गायकवाड यांच्या मातोश्री स्वर्गिय अनुसयाबाई गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंचोली येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्री फुले व स्वर्गिय मातोश्री अनुसयाबाई गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले .

 दिवसेंदिवस समाजामध्ये मोठमोठे कार्यक्रम करण्याची एक स्पर्धा चालू झालेली आहे. पण पुण्यतिथी निमित्त व वाढदिवसानिमित्त जेवणा वरील खर्च कमी करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे ही काळाची गरज झालेली आहे असे गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती नायगाव अशोक पवळे यांनी कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.

 विद्यार्थ्यांना पाण्यासाठी बॉटल,  वही व पेन आदी शालेय साहित्य वाटप करून समाजापुढे  आदर्श निर्माण केला आहे.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच प्रतिनिधी अशोक पाटील मोरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षण अधिकारी अशोक पवळे सर, केंद्रप्रमुख चिखलवाड सर, केंद्रीय मुख्याध्यापक राजेश्वर  डोमशेर सर, पदोन्नत मुख्याध्यापक धुळगंडे सर, नरंगल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदाशिवराव शिंदे, गोदमगाव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खोबाची डोंगरे,  राणाप्रताप चंदावाड सर, एमटी मोरे सर, तंत्रस्नेही शिक्षक सुनील डोईबळे सर, माधव वटपलवाड सर, अंबुलगे सर, अमृतवाड सर, तर्फे वाड सर, दत्ता पाटील सर,  मेक लोड सर,  माधव गायकवाड सर, शिवराज मोरे सर, विठ्ठल अंगरोड सर, विनायक पवार सर, गोपतवाड सर, सूत्रसंचलन भारत घोरपडे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ स्वाती अडबलबार मॅडम यांनी परिश्रम घेतले. आभार मुख्याध्यापक उत्तम गायकवाड यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Pages