घोटी येथे अजय देहाडे ,संतोष जोंधळे यांच्या बुद्ध-भिम गितांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 25 April 2022

घोटी येथे अजय देहाडे ,संतोष जोंधळे यांच्या बुद्ध-भिम गितांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन

किनवट : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त  तालुक्यातील घोटी येथे दि २८ एप्रिल रोजी "काळजावर कोरलय नाव आमच्या  भिमा कोरेगाव फेम, " अजय देहाडे व युवा रॉकस्टार संतोष जोंधळे यांच्या बुद्ध-भिम गितांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन "स्मृ. सुभाष पाटील धम्म विचार मंच", 'क्षितिज भवरे नगरी', येथे करण्यात आले आहे.

           

            या कार्यक्रमाचे उदघाटन प्राचार्य मोहन मोरे हे करणार आहेत, तर अध्यक्ष अरूणदादा आळणे हे असणार आहेत.

यावेळी यादवराव तामगाडगे गरूजी, डॉ.सुनील भवरे,यशोधरा मुनेश्वर, डॉ.जयपाल  पाटील,निवेदिता गणेश पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

  

  आ.भीमराव केराम, माजी आ.प्रदीप नाईक,अरुण डोंगरे, अभि. प्रशांत ठमके, प्रकाश गायकवाड, अभिमन्यु साळुंके, विकास कुडमेते,प्रवीण म्याकलवार,अनिल कऱ्हाळे, हिराबाई आडे,प्रकाश गब्बा राठोड, प्रेमसिंग जाधव, अनिल महामुने(शिक्षणाधिकारी प.स.),आनंदराव वाढे, दादाराव कयापाक,राजू सुरोशे, ऍड. प्रकाश गेडाम, मारोती भरकड, बालाजी पावडे, कैलास भगत, विनोद भरणे, किसनराव ठमके, दीपकदादा ओंकार, यांची उपस्थिती लाभणार आहे.

       

     या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भीम जयंती उत्सव समितीचे दत्ता कसबे, लक्ष्मण भवरे, सतीश भवरे, राम शंकधरे, गणेश पाटील ,सूरज भवरे, साहेबराव भवरे, आकाश भवरे, धम्मदीप पाटील,राहुल पाटील,ऋषिकेश लढे, धम्मपाल पाटील, राहुल पाटील, तेजस पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages