मुंबई दि. 13 - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 131 व्या जयंतीनिमित्त तमाम आंबेडकरी जनतेला सर्व देशवासियांना केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे.
रिपब्लिकन पक्षाचे जे गटतट विसर्जित करून रिपब्लिकन ऐक्य घडवून व्यापक एकसंघ रिपब्लिकन पक्ष निर्माण करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार झाला पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहोत मात्र आत त्यासाठी जनतेने साथ द्यावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले आहे.
रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा सोडून अन्य कोणत्याही पक्षाचे काम करणार नाही असा निर्धार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आंबेडकरी जनतेने केला पाहिजे. वेगवेगळे पक्ष स्थापन करू नये तर एकच रिपब्लिकन पक्षाचे काम करावे हीच डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ईच्छा होती.
रिपब्लिकन ऐक्याला विरोध करतील त्या नेत्यांना जनतेने विरोध केला पाहिजे. जनतेच्या रेट्यातून रिपब्लिकन ऐक्य घडू शकते.आंबेडकरी जनतेने निर्धार केल्यास रिपब्लिकन पक्ष प्रबळ होऊ शकतो.
एकच लक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष साकार करणे असा निर्धार करा. आम्ही संपूर्ण देशात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्षाचा वारसा चालवीत आहोत.
दलित बहुजनांनी राजकीय काम करतानाच सामाजिक आणि आर्थिक समतेच्या दिशेने पुढे जाण्यासाठी आपण काम केले पाहिजे.आंबेडकरी समाजात औद्योगिक आणि आर्थिक क्रांती करण्याचा आम्ही निर्धार करीत आहोत त्यासाठी कटिबद्ध आहोत असे सांगत ना रामदास आठवले यांनी आंबेडकरी जनतेला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment