एयरपोर्टस् अथोरिटी मध्ये अनुसूचित जातीजमातीचा अनुशेष भरून काढा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 28 April 2022

एयरपोर्टस् अथोरिटी मध्ये अनुसूचित जातीजमातीचा अनुशेष भरून काढा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.28 -  एयरपोर्टस् अथोरिटी ऑफ इंडिया  मध्ये अनुसूचित जातीचे 15 टक्के आणि अनुसूचित जमाती चे 7.50 टक्के आरक्षित जागा भरल्या पाहिजेत. अनुसूचित जाती जमातींचा नोकरीतील अनुशेष भरून काढला पाहिजे.अनुसूचित जाती जमातीच्या कामगारांचा प्रश्न सोडविण्यासोबत सर्वच जाती धर्मीय सर्व कामगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही लक्ष देऊ कोणताही भेदभाव न करता सर्वांना  न्याय मिळवून देणे आपले काम आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 


एयरपोर्टस अथोरिटी ऑफ इंडिया एस सी एस टी एम्प्लॉईज वेल्फेयर असोसिएशनच्या वतीने आज मुंबईत विलेपार्ले येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ;महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा संयुक्त जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले उपस्थित होते.यावेळी एयरपोर्ट अथोरिटी 

चे पश्चिमी क्षेत्र चे संचालक जे टी राधाकृष्ण  ;आमदार पराग आळवणी;सतीश कुमार; देवी सिंग राणा; ए ए आय एस सी एसटी असोसिएशन चे पदाधिकारी भाऊ संगारे; राकेश मोहिते;नागेश साळवी;राजेश वानखेडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.


 नविदिल्ली येथे एयरपोर्ट अथोरिटी ऑफ इंडिया च्या एका इमारतिला  राजीव गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाव देम्यात आले आहे त्याच धर्तीवर मुंबईत एयरपोर्टस् अथोरिटी ऑफ इंडिया च्या इमारतिला महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी असून ही मागणी मंजूर करण्यासाठी आपण केंद्रीय विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र पाठविणार असल्याचे ना.रामदास आठवले  यावेळी म्हणाले.


               

No comments:

Post a Comment

Pages