नांदेड दि. 11 :- सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचे प्रबोधन जिल्हास्तरावर समता दुतांमार्फत करण्यात येत आहे. या अनुषंगाने नांदेड येथील महात्मा फुले पुतळा, आयटीआय कॉर्नर व मध्यवर्ती बसस्थानक येथे आज विविध कार्यक्रम घेण्यात आले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने सामाजिक समता कार्यक्रम 6 ते 16 एप्रिल 2022 पर्यंत सुरु आहे. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बार्टीच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती सुजाता पोहरे, गंभीर शेंबेटवाड, बार्टीचे समतादुत विनोद पाचंगे, दिलीप सोंडारे, दिगांबर पोतूलवार, अमित कांबळे, नागनाथ कोलमारे, श्रीमती ज्योती जाधव, राणी पदमावती बंडेवार, जयश्री गायकवाड, दिपाली हडोळे व सामाजिक कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविकात श्रीमती सुजाता पोहरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी समतादुतांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती पथनाटय व लघुनाटिकेद्वारे उपस्थितांना दिली.
No comments:
Post a Comment