महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 22 April 2022

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

मुंबई:

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेला दिनांक 18 एप्रिल 2022 रोजी 36 वर्ष पूर्ण झाले आहेत. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या वतीने दिनांक 12 ते 18 एप्रिल 2022 या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 

          महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेची स्थापना सन 1986 साली कोल्हापुर येथे करण्यात आली. परिषद स्थापनेच्या उद्दिष्टानुसार तत्वज्ञान विषयाच्या अभिवृत्तीसाठी प्रयत्न करणे, त्याचप्रमाणे समाजाच्या सर्व स्तरात तत्त्वज्ञानाविषयी आस्था, आवड, अभिरुची निर्माण करून ती दृढ करणे, त्यासाठी प्रयत्न व उपाय योजने करणे या हेतूने या वर्षीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात दिनांक 12 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद आणि संभाजीराव केंद्रे महाविद्यालय जळकोट जिल्हा लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने "स्त्री संत साहित्यातील तत्वज्ञान व मानवी जीवन" या विषयावर ऑनलाइन एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्राचे प्रमुख पाहुणे तथा वक्ते म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे उपस्थित होते. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.टी. लहाने अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.  यावेळी मतपचे अध्यक्ष डॉ सुनीलदत्त गावरे यांची विशेष उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. माधव कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

              बुधवार दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये एकूण 47 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. स्पर्धेसाठी गौतम बुद्धाचे जीवनविषयक तत्त्वज्ञान, मॅनेजमेंट गुरु: छत्रपती शिवाजी महाराज, नई तालीम: महात्मा गांधींचे जीवन विषयक तत्वज्ञान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्म विषयक तत्वज्ञान, महात्मा ज्योतिबा फुले यांचे समतेचे तत्त्वचिंतन या विषयावर स्पर्धक विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण केले. या स्पर्धेमध्ये श्री. रोहित झोटिंग  विद्यावर्धिनी सभेचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धुळे याने प्रथम क्रमांक मिळविला. कु. सावनी माने परशुराम भाऊ महाविद्यालय पुणे हिने द्वितीय क्रमांक मिळविला. तर कु. श्रेया सबनीस परशुरामभाऊ महाविद्यालय पुणे या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेचे समन्वयक म्हणून डॉ. बाजीराव पाटील व विजय शेडगे यांनी काम पाहिले.

             दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तर्कशास्त्र आणि तत्त्वज्ञान विभाग आबासाहेब गरवारे कॉलेज, पुणे आणि महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मचिंतन या विषयावर विशेष ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. महेश देवकर विभाग प्रमुख पाली आणि बौद्ध अध्ययन विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी आपले विचार व्यक्त केले. तर अध्यक्षस्थानी डॉ. पी. बी. बुचडे आबासाहेब गरवारे महाविद्यालय हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन तर्कशास्त्र आणि तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. प्रदीपकुमार माने यांनी केले.

          दिनांक 15 एप्रिल 2022 रोजी विद्यार्थ्यांसाठी तत्वज्ञानातील जीव, आत्मा  ईश्वर इत्यादी संकल्पनेवर पाच मिनिटांची व्हिडीओ क्लिप स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत कु. आरती काटेकर हिचा प्रथम क्रमांक, कु.निकिता पाटील द्वितीय क्रमांक, तर कु.वैष्णवी कारणीक हीचा तृतीय क्रमांक आला. या स्पर्धांचे संयोजन डॉ.संगीता पांडे व प्रा.आभा बागाईतकर यांनी केले. 

            दिनांक 16 एप्रिल 2022 रोजी "महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या आजी व माजी पदाधिकाऱ्यांचे हितगुज" हा कार्यक्रम मतपचे अध्यक्ष डॉ. सुनीलदत्त गवरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. तत्त्वज्ञान विषयाचा विस्तार व विकास कशा पद्धतीने करता येईल या विषयावर ज्येष्ठ प्राध्यापकांनी आपली मते व्यक्त केली. यामध्ये डॉ. बी. आर. जोशी, डॉ. नागोराव कुंभार, डॉ. प्रदीप गोखले डॉ. शर्मिला वीरकर, डॉ. शुभदा जोशी, डॉ. गौरी भागवत, डॉ. भाऊसाहेब काळे, डॉ. विजय कांची आदि तत्त्वज्ञान प्रेमींनी चर्चा केली. या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून डॉ. सुनीलदत्त गवरे व डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांनी काम पाहिले. अशा या कार्यक्रम घेण्यामागचा हेतू काय आहे याविषयी डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिषदेचे सदस्य प्रा. पुरुषोत्तम वानखेडे यांनी केले. तर आभार प्रा. आभा बागाईतकर यांनी मानले.

               दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी "संत ज्ञानदेवांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान" या विषयावर महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद आणि अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन वेबिनार आयोजित केले होते. या वेबिनारचे प्रमुख पाहुणे मा. श्री. कैलास येवले संत साहित्याचे अभ्यासक, आळंदी यांनी संत ज्ञानदेवांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान या विषयावर आपले विचार व्यक्त केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अगस्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर शेळके उपस्थित होते. यावेळी मतपचे अध्यक्ष डॉ. सुनीलदत्त गवरे यांची विशेष उपस्थिती होती.  या कार्यक्रमाचे संयोजन तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार शेडगे व डॉ. धनराज हाडोळे यांनी केले.

               दिनांक 18 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या वतीने प्रोफेसर डॉ. सुनील कुलकर्णी, हिंदी विभाग प्रमुख, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांचे "संत विचारांची सामाजिक फलश्रुती" या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले होते. याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत डॉ. नागोराव कुंभार यांनीही प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुनीलदत्त गवरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन तथा प्रास्ताविक मतपचे कार्याध्यक्ष डॉ. अमन बगाडे यांनी केले. कार्यक्रमातील प्रमुख वक्त्यांचा परिचय परिषदेचे कार्यवाह डॉ. बाळासाहेब मुळीक यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिषदेचे कार्यवाह डॉ. प्रदीपकुमार माने यांनी केले. तर आभार सदस्य डॉ. नवनाथ रासकर यांनी मानले. या वर्धापन दिन साप्ताहिक कार्यक्रमाची सांगता प्रा. आभा बागाईतकर यांनी पसायदानाने केला.

             या वर्धापन दिन सप्ताह साजरा करण्यासाठी महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुनील दत्त  गवरे, कार्याध्यक्ष डॉ. अमन बगाडे, उपाध्यक्ष डॉ. संगीता पांडे व डॉ. वेदप्रकाश डोणगावकर, खजिनदार डॉ. ज्ञानदेव उपाडे, कार्यवाहक डॉ. बाळासाहेब मुळीक, डॉ. माधव कांबळे, डॉ. प्रदीपकुमार माने परिषदेचे सदस्य डॉ. नवनाथ रासकर, डॉ. विजय शेडगे, प्रा. पुरुषोत्तम वानखेडे, प्रा. सायरा मुलानी, ले. प्रा अनघा पाध्ये, डॉ. बाजीराव पाटील, प्रा. राम गव्हाणे, प्रा. आभा बागाईतकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचा महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील व विद्यापीठातील 1500 विद्यार्थी व प्राध्यापकांनी लाभ घेतला.

No comments:

Post a Comment

Pages