नांदेड ,जय भोसीकर :
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते यशवंत गोसावी यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आज दि. २८ एप्रिल रोजी देवकृपा लॉन्स, छत्रपती चौक, पूर्णा रोड येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचा हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक तथा शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी केले आहे.
नुकतीच ११ एप्रिल रोजी महात्मा फुले व १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी झाली. मानवजातीच्या उद्धारासाठी आयुष्य पणाला लावून व्यवस्थेच्या विरुद्ध लढा उभारण्याचं काम या महामानवांनी केले. त्यांचे विचार व कार्य समजण्यासाठी व त्यांचा प्रचार प्रसार करण्याच्या शुद्ध हेतूने विठ्ठल पावडे यांनी सर्वधर्मीय संयुक्त जयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. नांदेड शहरात आजपर्यंत विविध प्रबोधनाचे कार्यक्रम व लोकोपयोगी उपक्रम आयोजित करून पावडे यांनी यशस्वी केलेले आहेत. नांदेड शहर व तालुक्यातील सर्व फुले-आंबेडकर विचारधारेच्या अनुयायांसाठी ही चांगली उपलब्धी ठरणार आहे. या कार्यक्रमाला माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, विधान परिषदेचे गटनेते अमरनाथ राजूरकर, आ. मोहनराव हंबर्डे, महापौर जयश्रीताई पावडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, उपमहापौर अब्दुल गफार, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष निलेश पावडे, युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तिरुपती कोंढेकर व तसेच तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक पावडे यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment