गोदावरी फाउंडेशनच्या संवादिनी महिला मेळाव्याला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद ; मनोरंजात्मक खेळातून महिलांच्या गुणांना मिळाला वाव - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 10 April 2022

गोदावरी फाउंडेशनच्या संवादिनी महिला मेळाव्याला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद ; मनोरंजात्मक खेळातून महिलांच्या गुणांना मिळाला वाव

हिंगोली / नांदेड : महिलांसाठी कडक कायदे करून सुद्धा आजही समाजात महिलांवर कौटुंबिक हिंसाचार , अन्याय , अत्याचार सुरूच आहेत. या विरुद्ध आता महिलांनीच आवाज उठवला पाहिजे असे प्रतिपादन पुणे येथील प्रसिद्ध कायदेतज्ञ तथा महिला सल्लागार ऍड . रमा सरोदे  यांनी हिंगोली येथे आयोजित संवादिनी महिला मेळाव्याप्रसंगी केले . गोदावरी फाऊंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संवादिनी महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या यावेळी महिलांसाठी खणसाडी , बकेट बाॅल , उखाणा  रॅम्पवॉक या  मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात येऊन त्यांच्या कलागुणांना वाव  देण्यात आला . कार्यक्रमाला व्यासपीठावर गोदावरी फाउंडेशनच्या अध्यक्ष राजश्री पाटील , सचिव धनंजय तांबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती . 

             महिलांच्या सर्वांगीण गुंणाचा विकास व्हावा ,रोजच्या धकाधकीच्या जीवनातून मनोरंजना सोबतच ज्ञानार्जन मिळावे म्हणूनच गोदावरी फाउंडेशनच्या वतीने संवादिनी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलाविषयक कायदे यावर पुणे येथील प्रसिद्ध कायदेतज्ञ तथा महिला सल्लागार ऍड . रमा सरोदे  यांनी महिलांशी मुक्तपणे संवाद साधून महिलांच्या मनात असलेल्या भावनिक प्रश्नांना हात घातला व त्यांना बोलते केले त्या म्हणाल्या कि, आपला समाज  पुढारला आहे, महिलांसाठी कडक कायदे करण्यात आले परंतु पूर्वीपासून महिलांवर होणारे कौटुंबिक हिंसाचार , अन्याय अत्याचार कमी झाले नाहीत. उलट समाजात त्यामध्ये वाढ झाली आहे त्यामुळे येथून पुढे महिलांनी शांत राहून सहन करू नये तर  त्या विरुद्ध आता स्वतः समोर यायला हवे, एकत्र होऊन आवाज उठवला पाहिजे तरच हिंसामुक्त समाज निर्माण होईल समाजाला याची जाणीव होईल . महिलांसाठी सुरु  करण्यात आलेल्या विविध सुरक्षा सेल ची माहिती घ्यायला हवी . आपल्या आजूबाजूला घडत असणाऱ्या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवायला हवे. असेही त्या म्हणाल्या .  

      यावेळी गोदावरी फाउंडेशनच्या अध्यक्षा राजश्री पाटील महिलांशी संवाद साधताना म्हणाल्या कि, महिलांसाठी काम करणाऱ्या  त्या-त्या जाती धर्माच्या संघटना कार्य करत असतात पण जात -पात - धर्म -पंथ-पक्ष  या पलीकडे  जाऊन  काम करावे हि भावना मनात ठेवून गोदावरी फाउंडेशनची स्थापना करण्यात आली . स्त्रीला माणूस म्हणून जाणून घेण्याचा आणि माणूस म्हणून जगण्याची संधी निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या पदांवर काम करणाऱ्या महिलेच्या मनात कुठेतरी काहीतरी दुःख असतं, तिला व्यक्त व्हायला काहीतरी नवीन शिकायला ,व्यासपीठ निर्माण करण्याचे कार्य  गोदावरी फाउंडेशनकडून केल्या जात आहे . याच माध्यमातून  हिंगोली शहरातील महिलांना  व्यासपीठ मिळावे याकरिता कार्य सुरु असून त्याकरिता तुम्हा सर्वांची साथ खूप महत्वाची आहे . विविध उपक्रमाच्या माध्यमातून महिलापर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत . असे त्या म्हणाल्या . 

                      महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी अंताक्षरी, उखाणे , रॅम्पवॉक  मनोरंजनाचे विविध खेळ आणि  स्पर्धा घेण्यात आल्या  खण साडी स्पर्धेतील  विजेत्या प्रिया संजय गुठे , बकेट बॉल स्पर्धेतील  विजेत्या अर्चना तोष्णीवाल  आणि उखाणा  स्पर्धेतील विजेत्या सुवर्णा रमेश रामपुरकर यांना मान्यवरांच्या हस्ते  विशेष प्रोत्साहनपर खण साडी,प्रमाणपत्र व  विविध बक्षीस वितरण करण्यात आले .कार्यक्रमाला गोदावरी फाउंडेशन मार्गदर्शक समितीच्या सुनीताताई मुळे, रुपालीताई गोरेगावकर, कांचन बागडीया सुरेखा कटके , ऍड.अश्विनी शहा, मीरा कदम, अश्विनी यबंल, सिमा मगर , माधवीताई पाटील गोरेगावकर , अर्चना जाधव , सुमित्रा रामगिरवार, संगीता चौधरी, सुरेखा कटके , शोभा सोनी, प्रणिता पांडे,लता सोनवणे, कीर्ती लादनिया गौरी गुंडेवार यांची उपस्थिती होती तर  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोदावरी फाउंडेशन च्या नैना पैठणकर, शिवाजी पातळे, सोनीली सुलभेवार, संकेत कदम, जसवंतसिंघ करबिन ,गोदावरी अर्बन शाखेचे प्रदीप देशपांडे, अंकुश बिबेकर,  जयवंत देशमुख विशाल नाईक, रंजना हरणे ,ममता ओझा, रक्षंदा मुखीरवार, श्रुती मद्रेवार, संदीप बोरगेमवार, गोपाल जाधव , गजानन सूर्यवंशी , अमोल बुद्रुक प्रविण पाईकराव यांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाला हिंगोली आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

No comments:

Post a Comment

Pages