नांदेड:
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या रौप्यमहोत्सवी वर्ष व बोधिसत्व, परमपूज्य, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध गायक, शिंदेंशाहीतील स्वरसम्राट आदर्श शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम महापालिकेच्या वतीने नवा मोंढा येथील बाजार समितीच्या मैदानावर आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन राज्याचे लोकनेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकरावजी चव्हाण यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. आपल्या बहारदार व प्रभावी गीतांनी मा.आदर्श शिंदेंनी जमलेल्या लाखो नांदेडकरांना आपल्या अमोघ स्वरांनी मंत्रमुग्ध केले. नांदेड महापालिकेला २५ वर्षे पूर्ण झाली .मा.आदर्श शिंदे यांनी गायलेली व सादर केलेली गीते नांदेडकरांच्या संस्मरणात राहणारी ठरली.. एका सुंदर व कान तृप्त करणाऱ्या आवाजाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी व तो आवाज ऐकण्यासाठी कलेचा आनंद घेण्यासाठी नांदेडकरांची लक्षणीय उपस्थिती होती.
कार्यक्रमास हिंगोलीचे खासदार श्री.हेमंतभाऊ पाटील, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत , विधानपरिषद गटनेते अमर राजूरकर, नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, मनपा आयुक्त डॉ.सुनिलजी लहाने , माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर तसेच शहर जिल्ह्यातील आजी, माजी लोकप्रतिनिधी, मनपा अधिकारी, कर्मचारी, व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment